Maoist Movement
esakal
माओवाद्यांचा वरिष्ठ नेता भूपती आणि रूपेशने आपल्या शेकडो सहकाऱ्यांसह पत्करलेली शरणागती, सुरक्षा यंत्रणांकडून सर्वच बाजुंनी होत असलेली कोंडी आणि शिरकाण तसेच सहा दिवसांपूर्वी जहाल माओवादी हिडमाचा चकमकीत झालेला खात्मा, यामुळे माओवाद्यांची घाबरगुंडी उडाली आहे. म्हणून आता महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड (एमएमसी) समितीने तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडे शरणागतीसाठी तयार असून फक्त १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत वेळ द्या, अशी कळकळीची विनंती केली आहे. 'एमएमसी'चा प्रवक्ता अनंत याने हे प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे.