माओवाद्यांची भूसुरुंग स्फोटके केली निकामी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

पोलिसांच्या सर्तकतेने मोठी दुर्घटना टळली

गडचिरोली: घातपात घडवून आणण्याच्या हेतूने नक्षलवाद्यांनी लावलेला भूसुरुंग आज (सोमवार) सकाळी बॉम्बशोधक व नाशक पथकाने बाहेर काढून निष्क्रिय केला. यामुळे मोठी दुर्घटना टळली.

धानोरा तालुक्‍यातल्या मुरुमगाव येथील पोलिस मदत केंद्रापासून 800 मीटर अंतरावर नागरी वस्तीमध्ये असलेल्या हातपंपाजवळ रविवारी (ता. 8) सायंकाळी काही मुलांना जमिनीतून केबल बाहेर आल्याचे दिसले. जवळच पंचायत समितीचे सभापती अजमन रावते आणि पोलिसांच्या सी-60 पथकातील कर्मचाऱ्यांचे निवासस्थान आहे. या संशयास्पद प्रकाराची माहिती गावकऱ्यांनी लगेच पोलिसांना दिली. पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेऊन पाहणी केली असता भूसुरुंग पेरले असल्याचा संशय आला. पण गडचिरोलीवरून रात्री बॉम्बशोधक-नाशक पथकाला पाचारण करून त्या ठिकाणी पाहणी करणे धोक्‍याचे असल्याने सकाळी पथकाला बोलविण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, आज पहाटे संपूर्ण परिसर रिकामा करून बॉम्बशोधक-नाशक पथकाने मोठ्या शिताफीने दोन सुरुंग बाहेर काढून ते निष्क्रिय केले.

Web Title: the maoists destroy the explosives in gadchiroli