अमरावतीत पुन्हा मराठ्यांची वज्रमूठ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

अमरावती : अमरावतीत 22 सप्टेंबर 2016 ला काढण्यात आलेल्या मूकमोर्चानंतरसुद्धा सरकारकडून काहीच उपाययोजना होत नसल्याचे सांगत मराठ्यांनी पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे. रुक्‍मिणीनगरातील अहिल्या मंगल कार्यालयात गुरुवारी (ता. दोन) अमरावती जिल्हा सकल मराठा समाजातर्फे नियोजन बैठक घेण्यात आली.

मंगल कार्यालयात समाजबांधवांनी प्रचंड गर्दी केली होती. गोंधळ, बाईक रॅलीसह नऊ ऑगस्टपर्यंत शहरात विविध कार्यक्रम घेऊन आंदोलनाची ज्योत तेवत ठेवली जाईल. अंबादेवीच्या मंदिरात 4 ऑगस्टला संध्याकाळी सहा वाजता गोंधळाचा कार्यक्रम होणार असून "आई राजा उदे उदे' असे त्या कार्यक्रमाचे नाव आहे. 8 ऑगस्टला सायंकाळी बाइक रॅली काढण्यात येणार आहे. आरक्षणासाठी ज्या 14 लोकांनी बलिदान दिले त्यांना सुरुवातीस श्रद्धांजली देऊन दोन मिनिटे मौन ठेवण्यात आले. या वेळी मराठा समाजातील गणमान्य मान्यवर उपस्थित होते.
कार्यालय हाउसफुल्ल
मराठा क्रांती मूक मोर्चात ज्याप्रमाणे समाजबांधव नियोजन बैठकीसाठी एकवटला होते. तशीच गर्दी अहिल्या मंगल कार्यालयात जमली होती. समाजबांधवांचा रोष या वेळी कार्यालयात बघायला मिळाला. ग्रामीण भागातील नागरिकही मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित होते.

Web Title: maratha andolan meeting