मराठा जातीचे पहिले जातप्रमाणपत्र उमरखेडमध्ये प्रदान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

उमरखेड (जि. यवतमाळ) : मराठा समाजाला 16 टक्‍के विशेष आरक्षण जाहीर झाल्यानंतर विदर्भातील पहिले मराठा जातीचे डिजिटल स्वाक्षरी असलेले ऑनलाइन प्रमाणपत्र आज, बुधवारी सव्वासहा वाजता उमरखेड येथे प्रदान करण्यात आले.

येथील उपविभागीय कार्यालयात स्वप्नील कनवाळे व बालाजी वानखेडे यांना उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र देण्यात आले. डिजिटली स्वाक्षरी असलेले मराठा समाजाचे हे पहिलेच प्रमाणपत्र असल्याचे सांगितले जाते. कदाचित, महाराष्ट्रातील ते पहिले असावे. मराठा जातीचा दाखला ऑनलाइन पद्धतीने "आपले सरकार सेवा केंद्रा'चे संचालक सचिन घाडगे यांच्यामार्फत काढण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार सुधीर देशमुख, शिवाजी माने, प्रवीण सूर्यवंशी, प्रवीण कलाणे, विकास डोळस, भागाजी शिवरतवाड, अमोल भालेराव, भागवत माने आदी उपस्थित होते.
 
Web Title: maratha certificate news