आरक्षणासाठी सकल मराठा समाजाचा जामगावमध्ये ठिय्या

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी खामगाव येथील सकल मराठा  समाजाच्या वतीने आज स्थानिक उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन आणि डफडे बजावो आंदोलन करण्यात आले. तर उद्या (ता.8) ऑगस्ट रोजी या आंदोलनात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी घंटानाद आंदोलन करुन समाजाचे हजारो युवक मुंडन करणार आहेत. 

खामगाव - मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी खामगाव येथील सकल मराठा  समाजाच्या वतीने आज स्थानिक उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन आणि डफडे बजावो आंदोलन करण्यात आले. तर उद्या (ता.8) ऑगस्ट रोजी या आंदोलनात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी घंटानाद आंदोलन करुन समाजाचे हजारो युवक मुंडन करणार आहेत. 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरीता राज्यभर आंदोलने सुरु आहेत. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी तसेच मराठा आरक्षण मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी खामगाव येथे आज ( ता.7) ऑगस्ट ते 9 ऑगस्ट पर्यंत हे आंदोलन येथील उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर सुरु राहणार आहे. तर उद्या सरकारचे लक्ष वेधण्यासाठी घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनादरम्यान हजारो युवक मुंडन सुध्दा करणार आहेत.

गुरुवार (ता. 9) ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्र बंदचे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. तरी शाळा, कॉलेज, संस्थान व शहरातील व्यापार्‍यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून या आंदोलनाला सहकार्य करावे असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. या आंदोलनाला शिख समाज, मुस्लिम समाज, भारिप बहुजन महासंघ, डावी आघाडी यांनी पाठिंबा दिला आहे.

Web Title: Maratha community stays at Jamgagoan for reservation