वाशीम - गोवर्धन गावात मराठा युवकांचे शोले स्टाईल आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जुलै 2018

मराठा आरक्षण आंदोलनात काकासाहेब शिंदे या युवकाच्या मृत्यू प्रकरणी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी वाशीम जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही आंदोलनाची धग कायम आहे.

वाशीम : मराठा आरक्षण आंदोलनात काकासाहेब शिंदे या युवकाच्या मृत्यू प्रकरणी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी वाशीम जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही आंदोलनाची धग कायम आहे.

रिसोड तालुक्यातील गोवर्धन येथे मोबाईल टाॅवरवर चढून चार युवकांनी आंदोलन सुरू केले आहे. पोलिस प्रशासन गावात तळ ठोकून आहे. केनवड, एकांबा वडप टोलनाका येथेही रास्ता रोको आंदोलन सुरू आहे. कारंजा शहरात कडकडीत बंद पाळून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. कालपर्यंत शहरी भागात सुरू असलेले हे आंदोलन आता ग्रामीण भागात तिव्र होत आहे.

Web Title: maratha kranti morcha sholay style agitation in washim