अकोल्याचा आदित्य ठाकरे भारतीय युवा संघात विश्वचषक स्पर्धेत खेळणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जानेवारी 2018

अकोला - विदर्भाच्या संघात रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऐनवेळी अकोल्याच्या आदित्य ठाकरेला विदर्भ संघात घेण्यात आले. या संधीचे सोने करताच आदित्यला आता पुन्हा ऐनवेळी १९ वर्षाखालील ‘वर्ल्ड कप’ स्पर्धेसाठी भारतीय संघात सामावेश झाला आहे. अकोलेकरांसाठी हा योगायोग म्हणजे २०१८ चा ‘ग्रेट ओपनींग स्पेल’ ठरण्याची संधी मानण्यात येत आहे. 

अकोला - विदर्भाच्या संघात रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऐनवेळी अकोल्याच्या आदित्य ठाकरेला विदर्भ संघात घेण्यात आले. या संधीचे सोने करताच आदित्यला आता पुन्हा ऐनवेळी १९ वर्षाखालील ‘वर्ल्ड कप’ स्पर्धेसाठी भारतीय संघात सामावेश झाला आहे. अकोलेकरांसाठी हा योगायोग म्हणजे २०१८ चा ‘ग्रेट ओपनींग स्पेल’ ठरण्याची संधी मानण्यात येत आहे. 

बुधवारी (ता. १७) आदित्य मुंबई येथून न्युझीलंड येथे रवाना होत आहे. भारतीय संघाचा फास्टर इशान पोरवाल याला दुखापत झाल्याने आदित्यला तातडीने पाचारण करण्यात आले आहे. अकोल्याच्या मातीतून यापूर्वी नंदू गोरे, प्रशांत गुप्ते, आनंद चितळे, शाम काशिद, मंगेश कुळकर्णी, रवी ठाकूर आणि संतोष देशमुख या बोटावर मोजण्याइतक्या खेळाडूंनी रणजी ट्रॉफी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सहभाग नोंदविला. त्यानंतर प्रदीर्घ काळ ना विदर्भ संघाला यश मिळाले ना अकोल्याच्या खेळाडूंना विदर्भ संघात संधी नव्हती. मात्र, यावर्षी प्रथमच विदर्भाचा संघ रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाला. या अंतिम सामन्यासाठी अकोल्याच्या आदित्य ठाकरेची विदर्भ संघात निवड झाली. तोच क्षण अकोलेकरांच्या जल्लोषाचा होता. तसेच तो आदित्यने सार्थही करून दाखविला. न्युझीलंड दौऱ्यासाठी ऐनवेळी आदित्यला भारतीय संघात चमकदार कामगिरीची अकोलेकरांना आशा आहे.  

आदित्यने विदर्भाकडून खेळताना रणजी करंडक अंतिम सामन्यात आपल्या जलद माऱ्याने दिल्लीचे दोन गडी बाद करून विदर्भाला पहिले विजेदेपद पटाकावून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्याच्या या कामगीरीची निवड समितीने दखल घेतली. कर्णधार पृथ्वी शॉ याच्या नेतृत्वात भारतीय संघ न्युझीलंडमध्ये दाखल झाला असून रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर मात केली होती. यापूर्वीसुध्दा आदित्यने राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनात मलेशियात भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. 'आदित्यची भारतीय संघात निवड झाली. हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. तो शब्दात वर्णन करता येऊ शकत नाही. त्याने देशाचे नाव उज्ज्वल करावे, ही सदिच्छा.' असा आनंद आदित्यचे वडील प्रा. डॉ. शैलेश ठाकरे यांनी व्यक्त केला. 

Web Title: marathi news aditya thakare akola selected in indian world tournament