क्रिकेटर आदित्यच्या घरी विजयाचा जल्लाेष 

Akola News Cricketer Aditya Thakare winning celebration
Akola News Cricketer Aditya Thakare winning celebration

अकाेला : न्यूझीलंड येथे झालेल्या एकाेणविस वर्षाखालील क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय झाला. भारतीय संघात अकाेल्यातील रणजी बॉय आदित्य ठाकरे असल्याने अकाेल्यातही जल्लाेष करण्यात आला. 

रणजी करंडकनंतर आदित्य ठाकरेला न्यूझीलंड येथे पार पडलेल्या एकाेणविस वर्षाआतील क्रिकेट विश्वकरंडकमध्ये भारतीय संघाचा सदस्य हाेण्याची संधी मिळाली. अंतिम सामन्यात आदित्य खेळणार म्हणून अकाेलेकरांच्या आशा पल्लवीत झाल्या हाेत्या. मात्र, नशीबाची साथ न मिळाल्याने त्याला अंतिम अकरामध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही.

भारताने ऑस्ट्रेलियाचा आठ गडी राखून धुव्वा उडवत विश्वविजेतेपद मिळविले. या आनंदात आदित्यच्या वडिलांनी अंगणात फटांक्यांची आतषबाजी करून जल्लाेष केला. आपला मुलगा भारतीय संघाचा एक सदस्य म्हणून त्याला टीव्हीवर बघताना अादित्यच्या आई वडिल्यांच्या डाेळ्यांतून आनंदाश्रू आले. क्रिकेटमध्ये आदित्यला मिळणाऱ्या संधीमुळे आदित्यकडून अपेक्षा वाढल्याचे त्याच्या पालकांनी सांगितले. 

शुभेच्छांचा वर्षाव 

भारतीय संघ विजयी झाला अन् आदित्यच्या घरी जल्लाेषाचे वातावरण हाेते. आदित्यचे वडील डॉ. शैलेश ठाकरे यांना भ्रमणध्वनीवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. मुलाच्या कौतुकाने आदित्यच्या पालकांचे डाेळे भरून आले. 

रणजीनंतर आता एकाेणवीस वर्षाआतील विश्वचकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघात आदित्यला स्थान मिळालं. शिवाय संघाने विजय देखील मिळाला. त्याचा खुप आनंद आहे. संघात खेळण्याची संधी मिळाली असती, तर अकाेलेकरांसाठी नक्ककीच अभिमानाची बाब असती. 
- संगीता ठाकरे, आदित्यची आई 

आदित्यला भारतीय संघाचा एक सदस्य म्हणून स्थान मिळालं ही खूप अभिमानाची बाब आहे. त्याला खेळण्याची संधी मिळाली असती, तर त्याचा आनंद आणखी वेगळा झाला असता. भारत जिंकला आनंदाची बाब असून सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. 
- डॉ. शैलेश ठाकरे, आदित्यचे वडील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com