''कमी किमतीत शेतमाल विकू नये''

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

अकोला : शेतकऱ्यांनी त्यांचा कोणताही शेतमाल विक्री करताना हमीभावापेक्षा कमी किमतीत विक्री करू नये, असे आवाहन सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी अकोला येथे केले. 

अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विस्तारित बाजार जिनिंग प्रेसिंग फॅक्‍टरी आवारात किमान आधारभूत दरानुसार तूर खरेदी केंद्राच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी खासदार संजय धोत्रे, आमदार रणधीर सावरकर आदी उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, की शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी किंमत येत असेल व आर्थिक गरज असेल तर सरकारच्या शेतमाल तारण योजनेचा लाभ घ्यावा व आपला माल काही दिवसांसाठी तारण ठेवून योग्य बाजारभाव प्राप्त झाल्यावर विक्रीस काढावा. यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती आपल्याला सहकार्य करेल. 

राज्यात 'नाफेड'द्वारे तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करून आपला माल विक्रीस आणावा, असे सांगून ते म्हणाले, की आवश्‍यकता वाटल्यास व शेतकऱ्यांची मागणी असल्यास नवीन तूर खरेदी केंद्रे सुरू करण्यात येतील. 

Web Title: marathi news Akola News Minimum Support Price Maharashtra Subhash Deshmukh