आमदार बच्चू कडूंना एक वर्षाचा कारावास

वृत्तसंस्था
बुधवार, 17 जानेवारी 2018

या मारहाणप्रकरणी कडूंविरोधात चौधरींनी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून भारतीय दंड संहिता कलम 353, 332, 168 अशा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणाची सुनावणी अचलपूर न्यायालयात सुरु होती. ​

अचलपूर : कर्तव्य बजावत असलेल्या वाहतूक पोलिस कर्मचारी इंद्रजित चौधरी यांना जाब विचारत आमदार बच्चू कडू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चौधरी यांना शिवीगाळ आणि मारहाण केली. या खटल्याची सुनावणी आज झाली. न्यायालयाने बच्चू कडूंना दोषी ठरवत एक वर्षाचा तुरुंगवास आणि 600 रुपयांचा दंड ठोठावला आहे.

आमदार कडू आणि त्यांचे सहकारी 24 मार्च 2016 रोजी परतवाडा येथील एसटी डेपो चौकातून जात होते. यादरम्यान बस डेपोजवळ एका खासगी ट्रॅव्हल्सच्या बसेस उभ्या होत्या. त्यावरुन वाहतूक पोलिस कर्मचारी चौधरी हे चौकात कर्तव्य बजावत होते. त्यावेळी कडू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चौधरींना याबाबत जाब विचारला होता. चौधरी यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याच्या आरोपातून कडू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली होती. 

या मारहाणप्रकरणी कडूंविरोधात चौधरींनी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून भारतीय दंड संहिता कलम 353, 332, 168 अशा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणाची सुनावणी अचलपूर न्यायालयात सुरु होती.

त्यानंतर आज (बुधवार) न्यायालयाने बच्चू कडूंना दोषी ठरवत एक वर्ष तुरूंगवास आणि 600 रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Web Title: Marathi news Amravati news MLA Bacchu Kadu Get One Year Imprisonment And Fine For Beating Traffic Police Achalpur Court