हुक्क्याच्या व्यसनापायी मुलाचा ठेचून खून? 3 अल्पवयीन मुलांना अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

लहान मुले हुक्का (व्यसनं) करीत असल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले. आईवडिलांना मुले आपण व्यसन करीत असल्याचे माहित पडू नये म्हणून शाई खोडण्यासाठी वापरण्यात येणारे व्हाइटनर व थिनर द्रव्य रुमालावर टाकून त्याचा हुक्का मारतात. याचा वास येत नाही.

यवतमाळ : येथील अभिजित टेकाम (वय १२) हत्याकांडात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन अल्पवयिन आरोपीना आज (ता. १९) अटक केली.

येथील केंद्रीय विद्यलयात इयत्ता सहावीत शिकत असलेला अभिजित शिकवणीला जातो असे आईला सांगून घरून गेल्यानंतर घरी परतला नाही. त्यामुळे वडिलांनी अभिजितचे अपहरण झाल्याची शंका पोलीस फिर्यादीतून व्यक्त केली होती. अखेर शोध घेत असताना पोलिसांना शहराबाहेर सूरजनगर परिसरातील निर्जंनस्थळी त्याचा दगडाने ठेवलेल्या अवस्थैतेतील मृतदेह आढळून आला. पोलिसांनी या प्रकरणाचा कसून शोध घेतला असता आज तीन आरोपींना अटक केली. त्याचे मारेकरी हे त्याचे मित्र असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्या तिन्ही आरोपींनी अभिजितसोबत वाद झाल्याने त्याला दगडाने ठेचून मारल्याचे पोलिसांना  सांगितले.

लहान मुले हुक्का (व्यसनं) करीत असल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले. आईवडिलांना मुले आपण व्यसन करीत असल्याचे माहित पडू नये म्हणून शाई खोडण्यासाठी वापरण्यात येणारे व्हाइटनर व थिनर द्रव्य रुमालावर टाकून त्याचा हुक्का मारतात. याचा वास येत नाही. नशा मात्र देशीच्या दोन निपेएवढी येते. मुले त्यात झिंगू लागतात. भान हरवतात व वेळप्रसंगी त्यांच्या हातून असे गुन्हे घडण्याची शक्यता असते, असे सूत्रांनी सांगितले. बालकांमध्ये हा वाढत असलेला व्यसनाचा प्रकार पालकासाठी मात्र चिंतेचा विषय आहे.

Web Title: Marathi news breaking news Abhijit Tekam murder case three arrested