दुष्काळ मुक्त अभियानाचा शेतीसाठी स्तुत्य प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 मार्च 2018

धरणातील गाळ काढून शेतीसाठी वापरण्याच्या कामाचा प्रथम टप्पा म्हणून 7 मार्च ला जळगाव जा. येथे नवीन जेसीबीचे वाजत गाजत स्वागत करण्यात आले.

संग्रामपूर (बुलढाणा) - जिल्ह्यात दुष्काळ मुक्त अभियान राबविण्याच्या दृष्टीने शासन आणि भारतीय जैन संघटना यांचे संयुक्त प्रयत्नातून धरणातील गाळ काढून शेतीसाठी वापरण्याच्या कामाचा प्रथम टप्पा म्हणून 7 मार्च ला जळगाव जा. येथे नवीन जेसीबीचे वाजत गाजत स्वागत करण्यात आले. यामध्ये 9 जळगाव जा. आणि 9 संग्रामपूर येथे संघटनेचे वतीने जेसीबी प्राप्त झाल्या आहेत. धरण, तलाव, गाव तलाव, सिमेंट बंधारे, नाला खोलीकरण, सार्वजनिक शेततळे खोलीकरण आणि गाळ काढणे आदी कामे करून पाणी जिरवण्याचे काम या अभियानाततून होणार आहे. प्रायोगिक तत्वावर या जिल्ह्याची निवड असून नंतर राज्यभर हा उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती संबधिताकडून देण्यात आली.

Web Title: marathi news buldhana drought free campaign maharashtra