केजरीवाल यांच्या सभेला अखेर पोलिसांची परवानगी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जानेवारी 2018

आम आदमी पक्षाकडून या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सुरुवातीला राजकिय दबावामुळे पोलिस प्रशासनाने सभेची परवानगी नाकारली होती. यावर आपच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करुन 6 जानेवारीला पोलिस स्टेशन सिंदखेड राजा येथे निदर्शने केली. त्यामुळे प्रशासनाची गोची झाली. 

बुलडाणा : राजमाता जिजाऊ जन्मोत्सव दिनी 12 जानेवारीला सिंदखेड राजा शहरात आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सभेला अखेर पोलिसांनी परवानगी दिली आहे. अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. 

आम आदमी पक्षाकडून या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सुरुवातीला राजकिय दबावामुळे पोलिस प्रशासनाने सभेची परवानगी नाकारली होती. यावर आपच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करुन 6 जानेवारीला पोलिस स्टेशन सिंदखेड राजा येथे निदर्शने केली. त्यामुळे प्रशासनाची गोची झाली. भारतीय संविधानाने सर्वांना सभा घेण्याचा अधिकार दिला आहे. तो प्रशासनाने हुकुमशाही पद्धतीने दाबण्याचा प्रयत्न केला, अशी सर्वसामान्य जनतेत चर्चा निर्माण झाली. जनतेत सुद्धा पोलिस प्रशासनाच्या अशा दुट्टपी धोरणामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

स्थानिक जनता अरविंदजींच्या सभेबद्दल उत्सुक आहे. सुरक्षिततेच्या विचार करुन टी पॅाईट जवळ देउळगाव राजा रोड शिशमहलच्या मागे सिंदखेडराजा येथे सभा घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. जागेची पाहणी करण्यासाठी स्वत: पोलिस प्रशासनाचे पदाधिकारी आले होते. तसेच कार्यक्रमाचे संयोजक अॅड. लक्ष्मण कोल्हे व आपचे इतर पदाधिकारी यांच्याशी रितसर अशी चर्चा करण्यात आली. येत्या 12 जानेवारीला अरविंद केजरीवाल यांची सभा होणार असुन लाखोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी जनतेला केले आहे.

Web Title: Marathi news Buldhana news Arvind Kejriwal in Sindhkhed Raja