बुलडाणा: लोणी विक्री व्यवसायाने परराज्यांपर्यंत मारली मजल

पंजाबराव ठाकरे
बुधवार, 31 जानेवारी 2018

सततच्या दुष्काळी परिस्थितीने चारा टंचाई पाहता पशुधन संख्या घटत आहे. मात्र या भागात याही स्थितीत बाजार उपलब्ध असल्याने परिसरातील शेतकरी हे आव्हान पेलुन आहेत. शंभराचेवर कुटुंब या व्यवसायात गुंतुन आहेत. नगदी उत्पन्न म्हणून हा व्यवसाय बरेच कुटुंबाचा आर्थिक आधार बनला आहे.

संग्रामपूर (बुलडाणा) : तालुक्यातील पातुर्डा येथील लोणी विक्री व्यवसायाने परराज्यांपर्यंत मजल मारली आहे. 70 वर्षांपासून हा बाजार नियमितपणे सुरु असल्याने परिसरातील शेतकऱ्यांना दूध व्यवसाय वाढिला चालना देणारा ठरत आहे. दर सोमवारी सकाळी सातपासून हा बाजार सुरु होतो. अकरापर्यंत 4 तासांमध्ये लाखांचे वर उलाढाल होते.

शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून या गावा लगतचे 12 ते 15 खेडे आणि बाळापुर व तेल्हारा तालुक्यातील शेतकरी मिळुन लोणी निर्मितिची ही तीसरी पिढी सांगितली जाते. पातुर्डा येथील गणेश राठी यांचे घरात तीन पिढीपासून लोणी खरेदी केली जाते. शेराचे मापापासून हा व्यवसाय कुठलाही गट वा संस्था नसताना खाजगीमध्ये समुहाने अविरत सुरु आहे. शुद्ध गावरान तुपा साठी येथील लोणी महाराष्ट्र राज्यासह मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगढ़, राजस्थान आदी भागांमध्ये प्रसिद्ध आहे. येथील दिवंगत कचरुमल राठी यांनी शासकीय विभागातिल ओळखीने हा व्यवसाय वाढ़विला म्हणून आज स्पर्धेच्या युगात गावरान मेवा म्हणून येथील लोण्याला डिमांड आहे.

सततच्या दुष्काळी परिस्थितीने चारा टंचाई पाहता पशुधन संख्या घटत आहे. मात्र या भागात याही स्थितीत बाजार उपलब्ध असल्याने परिसरातील शेतकरी हे आव्हान पेलुन आहेत. शंभराचेवर कुटुंब या व्यवसायात गुंतुन आहेत. नगदी उत्पन्न म्हणून हा व्यवसाय बरेच कुटुंबाचा आर्थिक आधार बनला आहे. लोणी तयार करण्यात महिलांची मेहनत खुप मोठी आहे. शुद्धतेचि विश्वासहर्ता टिकून असल्याने दुरवरून नातेवाईक अथवा मित्र परिवाराचे माध्यमांतुन येथून लोणी खरेदी केले जाते. एकजुटीतून उभा असलेला हा बाजार विविध कंपन्यांच्या ब्रँडेड तुपाचे तुलनेत आजही वरचढ़ ठरावा असा आहे. लोणी बाजाराने पातुर्डा गावाला वेगळी ओळख निर्माण करुन दिली. हे विशेष!

Web Title: Marathi news Buldhana news milk market in sangrampur