वैद्यकीय आयोगाविरोधात डॉक्‍टर एकत्र

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 मार्च 2018

अमरावती - राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाला विरोध करण्यामागची आपली भूमिका  देशवासींना कळावी, यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) तर्फे देशाच्या विविध भागांत सायकल फेरी काढण्यात येत आहे. तशीच फेरी अमरावती शहरातदेखील काढण्यात आली. 

आयएमए सभागृहासमोर खासदार आनंद अडसूळ यांनी या सायकल फेरीला हिरवी झेंडी दाखविली. या वेळी आयएमए अध्यक्ष डॉ. बी. आर. देशमुख, डॉ. दिनेश वाघाडे, डॉ. वसंत लुंगे, डॉ. पद्माकर सोमवंशी, डॉ. चंद्रशेखर कुळकर्णी, डॉ. संगीता कडू, डॉ. पूनम बेलोकार, डॉ. डफडे यांसह आयएमएचे सुमारे ३०० पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. आयएमए सभागृहासमोरून निघालेली ही फेरी राठी विद्यालय, इर्विन चौक, रेल्वे स्थानक, पोलिस पेट्रोलपंप यामार्गे आयएमए सभागृह परिसरात दाखल झाली. या ठिकाणी डॉक्‍टरांची एक सभा झाली.  या वेळी डॉ. देशमुख व डॉ. ठाकरे यांनी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची  माहिती दिली. येत्या २५ मार्चला दिल्लीत देशातील सुमारे ५० हजरांवर डॉक्‍टर एकत्र येणार  असून या ठिकाणी महापंचायत होईल. त्यात पुढील निर्णय घेण्यात येईल, असे डॉ. देशमुख यांनी सांगितले.

Web Title: marathi news doctor IMA Against the medical commission