नक्षलवाद्यांकडून चाकूने भोकसून पोलिस शिपायावर हल्ला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 मार्च 2018

काही अंतरावर आठवडी बाजारात साध्या वेशातील काही नक्षल्यांनी पोलिस शिपाई गोमजी मट्टामी (वय-36) यांच्यावर चाकूने हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केले.

एटापल्ली : तालुक्यातील गट्टा (जांबिया) पोलिस ठाण्यापासून काही अंतरावर आठवडी बाजारात साध्या वेशातील काही नक्षल्यांनी पोलिस शिपाई गोमजी मट्टामी (वय-36) यांच्यावर चाकूने हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केले.

रविवार (ता. 4) दुपारी तीनच्यादरम्यान बाजार बंदोबस्तावर असलेले पोलिस शिपाई गोमजी मट्टामी यांच्यावर माओवाद्यांनी अचानक हल्ला केला. माओद्यांनी चाकूने छातीवर भोकसून गंभीर जखमी केले. मट्टामी यांना हेलिकॉप्टरने उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले आहे

Web Title: Marathi News Etapalli News Naxlite attacks on Police Constable