गडचिरोली जिल्हा दत्तक घेणार - जानकर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 मार्च 2018

चामोर्शी, (जि. गडचिरोली) - नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार व महिलांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्याची आवश्‍यकता असून विकासासाठी  आपण हा जिल्हा दत्तक घेणार असल्याची घोषणा पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी केली.

चामोर्शी येथील शरदचंद्र पवार कला महिला महाविद्यालयाच्या पटांगणावर रविवारी (ता. ११) राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने भव्य शेतकरी, शेतमजूर, युवक, महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार होते.

सरकारचे प्रत्‍येक धोरण हे लोकांच्या हितासाठी आहे. त्‍यामुळे सरकारच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही जानकर यांनी सभेत केले.

प्रमुख पाहुणे म्हणून रासपचे महासचिव बाळासाहेब दोडतले, महिला आघाडीच्या उपाध्यक्ष माधुरी पालीवाल, पूर्व विदर्भ सचिव संजय कन्नावार, विदर्भ अध्यक्ष मनोज साबळे, पूर्व विदर्भ सहकार आघाडीचे राजू झरकर, व्यापारी संघाचे अध्यक्ष गौतम गुंदेजा, भंडारा येथील दुग्ध संघ संचालिका निमा हलमारे, रासप प्रदेश सरचिटणीस ॲड. गजानन चौगुले, ॲड. अभिजित ऋषी, कृउबासचे उपसभापती प्रेमानंद मल्लिक, तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष गुरुदास चुधरी, जिल्हा बॅंकेचे संचालक अमोल गण्यारपवार, बंडू ऐलावार, सहकारी संस्थेचे निबंधक डी. डी. सरपाते, तालुका खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष मुरलीधर बुरे, उद्योजक जयसुखलाल दोषी आदी उपस्थित होते.कार्यक्रमाला बहुसंख्य शेतकरी उपस्‍थित होते.

Web Title: marathi news gadchiroli mahadev jankar