सीआरपीएफच्या जवानाने सहकाऱ्यांवर झाडल्या गोळ्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 मार्च 2018

जवानांमध्ये काही वाद झाल्याने रागाच्या भरात एका जवानाने इतर दोघांवर गोळ्या झाडल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

गडचिरोली : गडचिरोली येथील एटापल्ली तालुक्यात सीआरपीएफच्या जवानाने त्याच्या दोन सहकारी जवानांवर काल (ता. 6) बंदुकीच्या गोळ्या झाडल्या. या जवानांमध्ये काही वाद झाल्याने रागाच्या भरात एका जवानाने इतर दोघांवर गोळ्या झाडल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या घटनेत इतर दोन जवान गंभीर जखमी असून त्यांना अहेरी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, अहेरीतील प्राथमिक उपचारानंतर त्यांना काल (ता. 6) रात्री पुढील उपचारांसाठी नागपूरला हलविण्यात आले आहे.

गोळ्या चालवणाऱ्या आरोपी जवानाचे नाव संजय सेन्द्रे असून जखमींची नावे संघपाल विलास मारोती व एन. इंगळे अशी आहेत. या सर्व प्रकारानंतर रात्री उशिरा संजय सेन्द्रे या जवानाला पोलिसांनी अटक केली आहे. जवानाने नक्की कशामुळे गोळ्या झाडल्या याचा पुढील तपास पोलिस करत आहेत. 

Web Title: Marathi news gadchiroli news CRPF jawan fires on two colleagues

टॅग्स