समांतर रस्त्यासाठी जळगावकर उतरले रस्त्यावर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जानेवारी 2018

जळगाव - शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी समांतर रस्त्याचे काम त्वरीत सुरू करावे. या मागणीसाठी जळगावात समांतर रस्ता नागरीक कृती समितीतर्फे आज अजिंठा चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी आंदोलन ठिकाणी येऊन एप्रिल महिन्यात काम सुरू करण्याचे लेखी आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

समांतर रस्ते कृती समितीतर्फे आज सकाळी दहा वाजता अजिंठा चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी समांतर रस्ता नागरीक कृती समितीचे दिलीप तिवारी, शंभू पाटील, प्रतिभा शिंदे, फारूख शेख, विनोद देशमुख, डॉ.राजेश पाटील, किरण बच्छाव यांच्यासह महापौर ललीत कोल्हे, माजी महापौर नितीन लढ्ढा, रमेश जैन, करीम सालार, विष्णू भंगाळे, नगरसेवक अमर जैन, शिवसेनेचे आमदार चंद्रकांत सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री गुलाबराव देवकर, अॅड. रविंद्रभैय्या पाटील, अनेक सदस्य तसेच व्यापारी, उद्योजक, प्राध्यापक, महिला, शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिकांचा मोठा सहभाग घेतला होता. 

जिल्हाधिकाऱ्यांनी दिले लेखी आश्‍वासन 
आंदोलनस्थळी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर आल्यावर त्यांना कृती समितीतर्फे निवेदन देण्यात आले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी कृती समितीला रस्त्यांचे काम सुरू करण्याबाबत लेखी आश्‍वासन देऊन या समांतर रस्त्यासाठी शंभर कोटी रूपये मिळाले आहे. निविदा प्रक्रिया दोन महिन्यात पूर्ण करून एप्रिल महिन्यात कामाला प्रत्यक्षात सुरवात होवून वर्षभरात काम पूर्ण होईल असे सांगितले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 
 
Web Title: marathi news jalgaon parallel load to highway