कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ कोरपना तालुका बंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

कोरपना (जि. चंद्रपुर) - कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ कोरपना तालुक्यात ठिकठिकाणी संपूर्ण शंभर टक्के बंद पाळण्यात आला. घटनेचा निषेध करण्याकरीता मोर्चा काढून व सभा घेवून निषेध व्यक्त करण्यात आला. 

भीमा कोरेगांव घटनेच्या निषेधार्थ कोरपना तालुक्यातील कोरपना, नान्दा, वनसडी, अवारपुर, सोनुर्ली अशा विविध गावागावात कडेकोट बंद पुकारण्यात आला. बंदच्या दिवशी एकही एस टी बस रस्त्यावरुन न धावल्याने व बंदच्या दिवशी अनेकांनी इतरत्र
जाण्याचे टाळाल्याने कोरपना, गडचांदुर, नान्दा येथील बस स्थानकावर शुकशुकाट पहावयास मिळाला. गडचांदुर येथील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निषेध सभा घेवून घटनेचा निषेध करण्यात आला. याप्रसंगी गडचांदुर व परिसरातील गावातील भीमसैनिक एकत्र आले होते. गडचांदुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनखाली कोरपना थानेदार परघने, गडचांदुरचे ठाणेदार विनोद रोकडे यांनी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याप्रसंगी तालुक्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.

Web Title: Marathi News koregaon Bhima rites koparna Protest