पोलिस-नक्षलवादी चकमकीत 7 नक्षलवादी ठार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 डिसेंबर 2017

गडचिरोली:- सिरोंचा तालुक्यातील सीमावर्ती झिंगानुर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत कल्लेड जंगलात पोलिसांनी मोठी कारवाई केली. नक्षलशोध मोहिमेदरम्यान पोलिस-नक्षलवादी झालेल्या चकमकीत 7 नक्षलवादी ठार झाले आहेत. 

गडचिरोली:- सिरोंचा तालुक्यातील सीमावर्ती झिंगानुर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत कल्लेड जंगलात पोलिसांनी मोठी कारवाई केली. नक्षलशोध मोहिमेदरम्यान पोलिस-नक्षलवादी झालेल्या चकमकीत 7 नक्षलवादी ठार झाले आहेत. 

गडचिरोलीमध्ये सिरोंचा तालुक्यातील जंगल परिसरात पोलिसांचा कॅम्प भरवण्यात येणार असल्याची माहिती नक्षलवाद्यांना मिळाली होती. त्यानुसार नक्षलवाद्यांनी हा हल्ला केला. पोलिसांनीही सडेतोड प्रत्युत्तर दिले. पोलिसांच्या या कारवाईत 5 महिला आणि 2 पुरुष नक्षलींचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले. तसेच मोठ्या प्रमाणावर नक्षल साहित्य आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. या चकमकीनंतर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वर्षभरातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, नक्षलवाद्यांनी आपल्या भूमिगत सेनेच्या स्थापनेनिमित्त सध्या बंद पुकारला आहे. 

Web Title: marathi news local police naxalite 7 dead gadchiroli