कीटकनाशकाच्या विषबाधेने घेतला 25 शेतकर्‍यांचा बळी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

यवतमाळ : कीटकनाशकाच्या विषबाधेने विदर्भातील शेतकर्‍यांच्या बळीचा आकडा दररोज फुगतो आहे. आतापर्यंत 25 शेतकर्‍यांचे बळी गेले आहेत. हजारांवर शेतकरी बाधित आहेत. एकट्या यवतमाळ जिल्ह्यात बाधितांची संख्या सातशेवर पोहोचली आहे. मात्र, ही बाब राज्यकर्त्यांनी फारशे गांभीर्याने घेतल्याचे दिसत नाही. त्यामुळे लोकांमध्ये त्यांच्याविरोधात कमालीचा रोष दिसून येत आहे.

वणी तालुक्यातील कृष्णापूर येथील जंगलू महादेव ठावरी (वय 48) यांचा गुरुवारी (ता. 5) उपचारादरम्यान वणीच्या सुगम हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. त्यांना 29 सप्टेबर 2017 रोजी विषबाधा झाली होती. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी भरती केले होते.

त्यांच्या मृत्यूने यवतमाळ जिल्ह्यातील मृतांची संख्या आता 20 वर पोहोचली आहे.

आतापर्यंत वणी तालुक्यातील मृतांची संख्या दोन झाली असून बाधितांची संख्या 70 वर पोहोचली आहे. तर नागपूर, वर्धा व भंडारा येथील चार शेतकर्‍यांचा मृत्यू झाल्याची माहिती तेथील प्रशासनाने जाहीर केली आहे. मात्र हा आकडा जास्त असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व्हेंटिलेटवर असलेल्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. तसेच दररोज दहा ते पंधरा शेतकरी भरती होत आहेत.

Web Title: marathi news marathi websites Nagpur News yavatmal