लग्नाच्या चौथ्या वाढदिवसापूर्वीच मेजर मोहरकर हुतात्मा झाले! 

लग्नाच्या चौथ्या वाढदिवसापूर्वीच मेजर मोहरकर हुतात्मा झाले! 

पवनी (भंडारा) : 'दिल दिया है, जान भी देंगे.. ए वतन तेरे लिए' म्हणत आधीपासूनच सैनिक होण्याचे स्वप्न प्रफुल्ल मोहरकर यांनी पाहिले.. 2003 मध्ये ही स्वप्नपूर्ती झाली आणि अवघ्या 14 वर्षांत ते उच्च पदावर पोचले. देशरक्षणाची जबाबदारी असताना 2013 च्या 23 डिसेंबरला अबोली शिंदे यांच्याशी लग्नगाठ बांधली. विवाहाला चार वर्षे पूर्ण होत असतानाच मेजर प्रफुल्ल मोहरकर यांना देशासाठी वीरगती प्राप्त झाली. 

शनिवारी पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात तालुक्‍यातील जुनोना येथील मूळ रहिवासी असलेले मेजर प्रफुल्ल मोहरकर हुतात्मा झाले. काल (रविवार) त्यांच्या लग्नाचा चौथा वाढदिवस होता. 

पाकिस्तानने शनिवारी जम्मू-काश्‍मीरमधील राजौरीमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला. यात मेजर मोहरकर यांच्यासह चार जवान हुतात्मा झाले. हुतात्मा मेजर मोहरकर यांच्यावर भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे काल रात्री 1.45 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. अंत्यसंस्कारासाठी माजी खासदार नाना पटोले, आमदार रामचंद्र अवसरे यांच्यासह जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय आणि जिल्ह्यातील अधिकारी, विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. 

माजी मंत्री बंडू सवारबंधी यांनी मेजर मोहरकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. मेजर मोहरकर यांना लष्करी अधिकाऱ्यांकडूनही लष्करी इतमामात मानवंदना देण्यात आली. यावेळी लष्कराचे पदाधिकारी उपस्थित होते. 

मेजर प्रफुल्ल यांचे वडील अंबादास मोहरकर सेवानिवृत्त शिक्षक आहेत. आईदेखील शिक्षिका आहे. मेजर मोहरकर यांचे शिक्षण भिवापूर तालुक्‍यातील तास या गावी सातवीपर्यंत झाले. त्यानंतर 12 वी पर्यंत नागपूर येथे शिक्षण झाले. त्यांच्यामागे आई, वडील, पत्नी अबोली आणि भाऊ-वहिनी असा परिवार आहे. 

सकाळपासून मेजर मोहरकर यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी हजारो नागरिक उभे होते. रात्री 10.30 च्या सुमारास पार्थिव घरी येताच जनसागर उसळला. व्यापाऱ्यांनी एक दिवस संपूर्ण गाव बंद ठेवत श्रद्धांजली दिली. शहरातील प्रत्येक चौकात हुतात्मा मोहरकर यांना श्रद्धांजली देण्यात आली. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com