मुन्ना यादवचा जामीन फेटाळला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 मार्च 2018

नागपूर - मुन्ना व बाला यादव या दोघांचाही जामीन जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरुवारी फेटाळला. फटाके फोडण्याच्या वादातून मुन्ना ऊर्फ ओमप्रकाश यादव व मंगल यादव गटात सशस्त्र हाणामारी झाली होती. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी या प्रकरणातील प्राणघातक हल्ल्याचे कलम वगळून मारहाणीचे कलम लावले होते.

मुन्ना आणि बाला या दोघांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला. परंतु, आरोपींकडून हॉकी स्टिक जप्त करायची आहे तसेच त्यांच्या रक्ताचे नमुने घ्यायचे आहे, असे सांगत पोलिसांनी जामिनाला विरोध केला. न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून जामीन फेटाळला.

 मुन्नाचा मुलगा करण व त्याचे साथीदार, मंजू यादव यांच्या घरासमोर फटाके फोडत होते. यावरूनच वादाला सुरुवात झाली होती. दोन्ही गटांत हाणामारी होत असताना पोलिस पोहोचले. पोलिसांनी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा अध्यक्ष मुन्ना यादव गट आणि मंगल यादव अशा दोन्ही गटांविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला होता.

प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. गुन्हे शाखेने दोन्ही गटांविरुद्ध प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. मुन्ना यादव आणि त्याच्या सहकाऱ्यांवर भादंविच्या कलम ३२६ अन्वये, तर मंगल आणि त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध भादंविच्या कलम ३२४ अन्वये गुन्हे दाखल करून तपासाअंती आरोपपत्र दाखल केले आहे.

Web Title: marathi news munna yadav crime nagpur