बसमध्ये चढताना आईच्या हातातून पडून बाळाचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

नागपूर : बसमध्ये चढत असताना दरवाजा लागल्याने आईच्या हातात असलेला दीड वर्षीय चिमुकला खाली पडला. डोक्‍याला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज मंगळवारी सायंकाळी पाचच्या वर्धा रोडवरील विकासनगर चौकात घडली. या प्रकरणी आरोपी बसचालकावर प्रतापनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. उत्कर्ष नागराज गोल्हर (दीड वर्ष, रा. सेलू (घोराड), जि. वर्धा) असे या चिमुकल्याचे नाव आहे. 

गोल्हर कुटुंबीयांचे नातेवाईक प्रतापनगरातील पांडे ले-आउट येथे राहतात. दोन दिवसांपूर्वी नातेवाइकांची भेट घेण्यासाठी उत्कर्षची आई प्रिया त्याला घेऊन नागपूरला आली होती. मंगळवारी या मायलेकाला गावी जायचे होते. त्यामुळे सायंकाळी सहाच्या सुमारास उत्कर्षला घेऊन प्रिया स्नेहनगर येथील बसथांब्यावर आली होती. वर्ध्याला जाणाऱ्या बसची वाटत पाहत ते बसथांब्यावर उभे होते. त्याचवेळी नागपूर-चंद्रपूरमार्गे राजुऱ्याला जाणारी (एमएच 40 एपी 6145) बस आली.

बसचालक उमेश प्रभाकर कुक्‍शीकांत (रा. राजुरा) याने प्रवासी घेण्यासाठी बस थांब्याकडे वळविली. तोच बसच्या दाराचा धक्का उत्कर्षला लागून तो खाली पडला. लगेच त्याला जवळच असलेल्या ढोबळे हॉस्पिटल येथे नेले असता डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी अपघाताचा गुन्हा नोंदवून बसचालक उमेश कुक्‍शीकांत यास ताब्यात घेतले. 

माउली सैरभैर... पित्याची धडपड 
कडेवर असलेला लेक बसचालकाच्या आततायीपणामुळे खाली पडला. बसच्या चाकात येण्यापासून वाचला; परंतु दरवाजाचा मार डोक्‍याला बसल्याने रक्‍ताच्या थारोळ्या पडला. आईचा काळजाचा ठोका चुकला आणि हृदयात धस्स झाले. तिने चिुमरड्याला छातीशी लावून स्वतःच्या हुंदक्‍यावर आवर घातला नि "माझ्या बाळाला दवाखान्यात न्या'... असा हंबरडा फोडला.' दवाखान्यात पोहचल्यानंतर पतीला फोन केला आणि हकीकत सांगितली. तिकडे काळजाचा तुकडा आयसीयूत असल्याचे कळताच पित्याची धडपड सुरू झाली. होत्या त्या अवस्थेत पित्याने नागपूर गाठले. तोपर्यंत बाळाने प्राण सोडला होता.  

Web Title: Marathi News Nagpur Accidental death of baby at bus stand.