बोंडअळीच्या आढाव्यासाठी केंद्राचे पथक विदर्भात 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जानेवारी 2018

नागपूर - विदर्भ व मराठवाड्यात कापसावर बोंडअळी येण्यामागील कारणांचा आढावा घेण्यासोबतच नुकसानग्रस्तांच्या निश्‍चितीसाठी केंद्र सरकारचा चमू एक फेब्रुवारीला दौऱ्यावर येत आहे. एक फेब्रुवारीला नागपूरला पोचत त्यानंतर वर्धा, यवतमाळ, अकोला जिल्ह्याची पाहणी हे पथक करेल. 

केंद्र सरकारच्या या पथकाचे नाव क्षेत्र तपासणी आणि तांत्रिक मूल्यांकन समिती असे आहे. या समितीमध्ये 12 सदस्य आहेत. 1 फेब्रुवारीला सकाळी साडेआठ वाजता हे पथक नागपुरात पोचेल. वर्धा, यवतमाळ या भागातील कापूस शेताची पाहणी हे पथक करेल. त्यानंतर अकोला जिल्ह्यातील व मराठवाड्यातील प्रादुर्भावग्रस्त भागांना भेटी देत औरंगाबाद विमानतळावरून दिल्लीकडे रवाना होईल, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

Web Title: marathi news nagpur agriculture cotton