नऊ हजार थकबाकीदारांकडील वीजपुरवठा खंडित

Electric-Supply
Electric-Supply

नागपूर - महावितरणने परिमंडळातील नऊ हजार थकबाकीदार वीजग्राहकांकडील वीजपुरवठा खंडित केला. या कारवाईनंतर ग्राहकांनी वीजदेयकाचा २ कोटींचा भरणा केला. सोबतच पुनर्जोडणी शुल्कापोटी ५.४० लाख महावितरणच्या तिजोरीत जमा केले. 

वीज वापरून देयकाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करण्याऱ्या ग्राहकांविरुद्ध महावितरणने धडक कारवाई सुरू केली. नागपूर परिमंडळातील नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात मोहीम राबविण्यात येत आहे. नागपूर शहर मंडळ कार्यालयाने १ हजार ५५० नागपूर ग्रामीण मंडळ कार्यालयाने ४ हजार १३९ आणि वर्धा मंडळ कार्यालयाने २ हजार ९५५ वीजग्राहकांकडील वीजपुरवठा खंडित केला. 

वीज खंडित केल्यानंतर पुनर्जोडणी शुल्क भरणाऱ्यांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात येत आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वी विभागात ९६२ वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केल्यानंतर ५४ हजार ३६१ रुपयांचा पुनर्जोडणी शुल्कापोटी भरणा केला. हिंगणघाट विभागात १,१०० वीजग्राहकांनी ६० हजार ६५४ रुपयांचा, वर्धा विभागात ८९३ ग्राहकांनी ६३ हजार ५८० रुपये, नागपूर जिल्ह्यातील काँग्रेसनगर विभागात १ हजार १६३ ग्राहकांनी ८३ हजार ९४३ रुपये, बुटीबोरी विभागात ३८७ ग्राहकांनी ३३ हजार २४४ रुपये, काटोल विभागात ७७० वीजग्राहकांनी ४६ हजार ४५० रुपये, मौदा विभागात ९३७ ग्राहकांनी ५३ हाजार ३२ रुपये, नागपूर ग्रामीण विभागात सर्वाधिक १ हजार ७८९ वीजग्राहकांनी १ लाख ७ हजार ७ हजार रुपये, सावनेर विभागातील ६४३ वीजग्राहकांनी ३९ हजार २३० रुपयांचा भरणा पुनर्जोडणी शुल्कापोटी केला.

नियमित देयक भरण्याबाबत अनियमितता 
दोन्ही जिल्ह्यांमध्ये ९ लाख ३३ हजार ३६१ वीजग्राहक असून, ५ लाख ४२ हजार ३५० वीजग्राहक नियमितपणे वीज देयकांचे पैसे भरत असल्याचे निदर्शनास आले. नियमित बिलभरणा करणाऱ्या ग्राहकांनी वापरलेल्या वीजबिलापोटी ५१ कोटी २२ लाख १९ हजार रुपयांचा भरणा केला. उर्वरितांची सतत चालढकल सुरू असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com