आर्थिक नव्हे, गुणात्मक ‘बडेजाव’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जानेवारी 2018

नागपूर - बडोदा येथे होणाऱ्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आर्थिक नव्हे, तर गुणात्मक बडेजाव नक्कीच अनुभवायला मिळेल, असा दावा आयोजन समितीचे कार्याध्यक्ष व बडोदा येथील मराठी वाङ्‌मय परिषदेचे अध्यक्ष दिलीप खोपकर यांनी आज पत्रकार परिषदेत केला. 

नागपूर - बडोदा येथे होणाऱ्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आर्थिक नव्हे, तर गुणात्मक बडेजाव नक्कीच अनुभवायला मिळेल, असा दावा आयोजन समितीचे कार्याध्यक्ष व बडोदा येथील मराठी वाङ्‌मय परिषदेचे अध्यक्ष दिलीप खोपकर यांनी आज पत्रकार परिषदेत केला. 

बडोदा येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठ परिसरात १६, १७ व १८ फेब्रुवारीला हे साहित्य संमेलन होणार आहे. संमेलनातील कार्यक्रम तसेच आयोजनासंदर्भात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ व आयोजकांची संयुक्त पत्रकार परिषद नागपुरात घेण्यात आली. या संमेलनात चार परिसंवाद, एक कविसंमेलन, बोलीतील कविता, बहुभाषिक कविसंमेलन, यासह ‘प्रतिभावंतांच्या सहवासात’, ‘कथा, कथाकार, कथानुभव’, ‘टॉक शो’ या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘महाराजा सयाजीराव 
गायकवाड साहित्यनगरी’ असे नाव परिसराला देण्यात आले आहे.

संमेलनादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस, स्वागताध्यक्ष राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड आदींच्या हस्ते ‘महाराजा सयाजीराव गायकवाड समग्र चरित्रसाधने’च्या १२ खंडांचे प्रकाशन होणार आहे. आतापर्यंत बाहेरून येणाऱ्या ३५० प्रतिनिधींनी नोंदणी केली आहे.

साहित्य संमेलनाचे वेळापत्रक
१५ फेब्रुवारी (गुरुवार)
    ग्रंथदिंडी - सायंकाळी पाच वाजता
१६ फेब्रुवारी (शुक्रवार)
    संमेलनाचे उद्‌घाटन - दु. ४ वाजता
    कविकट्टा उद्‌घाटन - सायंकाळी ७.१५ वाजता
    ‘मराठी भाषासुंदरी’ कार्यक्रम - सायं. ७.३०
१७ (शनिवार)
    मंजूषा कुलकर्णी यांचे शास्त्रीय गायन - स. ६ वाजता
    निमंत्रितांचे कविसंमेलन - स. ९ वाजता
    श्‍याम मनोहर व गंगाधर पानतावणे यांचा सत्कार - स. ११ वाजता
    ‘सयाजीराव गायकवाड यांची नवभारताची संकल्पना’ परिसंवाद - दु. १२ वाजता
    ‘मराठी संत कवयित्रींची बंडखोरी’ परिसंवाद - दुपारी १२ वाजता
    ‘नागर ते नांगर’ टॉक शो - दु. २ वाजता
    ‘कथा, कथाकार, कथानुभव’ - दु. २ वाजता
    बहुभाषिक कविसंमेलन - सायं. ५ वाजता
    ‘श्रीनिवास खळे दर्शन’ - सायं. ७.३० वाजता

 १८ फेब्रुवारी (रविवार)
    संगीत पहाट - स. ६ वाजता
    न्या. चपळगावकर यांची मुलाखत 
    (मुलाखतकार - डॉ. सुधीर रसाळ व प्रशांत दीक्षित) - स. ९.३० वाजता
    ‘अनुवाद - गरज, समस्या आणि उपाय’ परिसंवाद - स. ९.३० वाजता
    रोहिणी हट्टंगडी, भरत दाभोळकर, 
    ॲड. उज्ज्वल निकम यांच्याशी गप्पा -
     स. ११.३० वाजता
    ‘राजकीय वास्तवाच्या चित्रणापासून लेखक दूर का?’ परिसंवाद - स. ११.३० वाजता,     बोलीतील कविता - दु. २ वाजता
    मान्यवरांचे काव्यवाचन - दु. २.३० वाजता
    खुले अधिवेशन व समारोप - बडोदे कलावैभव - सायं. ७.३० वाजता

Web Title: marathi news nagpur news akhil bharatiya marathi sahitya sammelan