व्याजाच्या पैशासाठी युवकाचे अपहरण 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 मार्च 2018

नागपूर - व्याजाचे पैसै न दिल्याने एका युवकाचे अपहरण करून त्यास मारहाण करीत ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आकाश ऊर्फ बॉबी बावणे (२९, रा. रामबाग कॉलनी) याच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०१७ ला आरोपी बॉबीने फिर्यादी अमोल राजकुमार नांदेकर (३१, रा. गिरीपेठ) यास २ हजार २०० प्रति दिवसप्रमाणे व्याज घेत १ लाख ७० हजार रक्कम त्यांना दिली होती. तसेच अमोलच्या गाडीवर ३ लाख देत दहा टक्‍के व्याज बॉबीने घेतले.

नागपूर - व्याजाचे पैसै न दिल्याने एका युवकाचे अपहरण करून त्यास मारहाण करीत ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आकाश ऊर्फ बॉबी बावणे (२९, रा. रामबाग कॉलनी) याच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०१७ ला आरोपी बॉबीने फिर्यादी अमोल राजकुमार नांदेकर (३१, रा. गिरीपेठ) यास २ हजार २०० प्रति दिवसप्रमाणे व्याज घेत १ लाख ७० हजार रक्कम त्यांना दिली होती. तसेच अमोलच्या गाडीवर ३ लाख देत दहा टक्‍के व्याज बॉबीने घेतले. जानेवारी २०१७ ते ९ मार्च २०१८ पर्यंत अमोलवर ३८ लाखांची रक्कम होत असल्याने बॉबी त्याला नेहमी पैशासाठी तगादा लावत होता. टाळाटाळ करीत असल्याने शुक्रवारी बॉबीने अमोलला आपल्या वाहनात कोंबून अपहरण केले. त्यानंतर व्याज आणि मुद्दल लवकर दे, असे म्हणत जबर मारहाण करून अमोलला जिवे मारण्याची धमकी दिली. घटनेनंतर घाबरलेल्या अमोलने सीताबर्डी ठाणे गाठून बॉबीविरुद्ध खंडणीचा गुन्हा नोंदविला. 

Web Title: marathi news nagpur news crime

टॅग्स