फुटबॉलचे भीष्म पितामह दादा मित्रा यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018

नागपूर - फुटबॉल क्षेत्रातील भीष्म पितामह मानले जाणारे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते प्रसिद्ध फुटबॉल प्रशिक्षक, संघटक व प्रशासक दुर्गा पाडो मित्रा (दादा मित्रा) यांचे बुधवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात बहीण, पुतणे, पुतणी व बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्यावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

याप्रसंगी फुटबॉल, हॉकीसह राजकीय, शैक्षणिक, सामाजिक व अन्य क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. ते क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात ‘दादा’ या नावाने लोकप्रिय होते. 

क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्य शासनातर्फे त्यांना १९९१-९२ मध्ये शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 

माजी आमदार एस. क्‍यू. झमा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शोकसभेत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी नागपूर जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष हरेश वोरा, कोषाध्यक्ष इकबाल काश्‍मिरी, सलीम बेग, विदर्भ हॉकी संघटनेचे सचिव विनोद गवई, फुटबॉल संघटनेचे युजिन नॉर्बर्ट, गुरुमूर्ती पिल्ले, टी. एन. सिध्रा, डॉ. बलदेव खन्ना, पोरवाल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनतोष घोषाल, फईमभाई, अब्दुल सत्तार अन्सारी, तपन भद्रा, माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू व पंच स्टॅनली ग्रेगरी, संजय लोखंडे, विजय रगडे, विनोद तिवारी आदी उपस्थित होते.

Web Title: marathi news nagpur news dada mishra death