ज्येष्ठ नागरिकासह दोघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 मार्च 2018

नागपूर - हुडकेश्वर आणि गिट्टीखदान परिसरात घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

नागपूर - हुडकेश्वर आणि गिट्टीखदान परिसरात घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

 हुडकेश्वर पोलिस ठाण्यांतर्गत मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास बेलदारनगर, दिघोरी रहिवासी राजेश हरिदास मारबते (३४) हे घरी झोपले होते. अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचाराकरिता मेडिकलमध्ये भरती करण्यात आले. परंतु, तपासून डॉक्‍टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी मिळालेल्या सूचनेवरून हुडकेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. दुसरी घटना गिट्टीखदान पोलिस ठाण्यांतर्गत मंगळवारी सकाळी ८.२० च्या सुमारास घडली. माहुरे पेट्रोलपंप मागे, आयबीएम रोड रहिवासी नामदेव महादेवराव सुरजुसे (७०) यांची प्रकृती अचानक खराब झाली. त्यांना उपचाराकरिता मेयो हॉस्पिटल येथे नेले असता, डॉक्‍टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

Web Title: marathi news nagpur news Senior Citizens

टॅग्स