‘शौचालयाचे पाणी’ गाजणार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 मार्च 2018

नागपूर - जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने जिल्हा क्रीडा स्पर्धेत विद्यार्थी आणि शिक्षकांना शौचालयाचे पाणी पाजल्याचा मुद्दा उत्तर नागपूरचे आमदार डॉ. मिलिंद माने यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित केल्याने जिल्हा परिषदेच्या सीईओ आणि संबंधित अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 

डॉ. माने यांनी शौचालय पाणीप्रकरणी शासनाने चौकशी केली का? केली असल्यास दोषी अधिकारी व कंत्राटदारावर काय कारवाई केली? असे प्रश्‍न उपस्थित केले आहेत. ग्रामविकास विभागामार्फत  याची नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे विचारणा केली. सोबतच कारवाई का केली नाही, विलंबाचे कारण काय, अशीही विचारणा केली आहे. 

फेरचौकशी करा
शौचालयातील पाणी पाजण्यास फक्त विस्तार अधिकारी सुरेश थोटे यांनाच दोषी धरण्यात येऊ नये. या प्रकरणाची फेरचौकशी करावी. नेमका जबाबदार कोण, याचा शोध घ्यावा, अशी मागणी आज महाराष्ट्र राज्य शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेचे अध्यक्ष विजय कोकोडे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मुख्याधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली. स्पर्धेकरिता जि. प.कडून थोटेंची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. नागपूर पंचायत समिती स्तरावरही गटशिक्षणाधिकाऱ्यांनी थोंटेच्या सहकार्याकरिता समित्या नियुक्त केल्या होत्या. परीक्षेच्या तोंडावर स्पर्धा असल्याने शिक्षण विस्तार अधिकारी परीक्षेच्या कामात व्यस्त होते. प्रत्यक्ष कामाच्या वेळी थोटेंना इतरांचे पाहिजे तसे सहकार्य लाभले नाही. समित्यांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जबाबदारीवरून हात वर केल्याने स्पर्धेच्या नियोजनाची जबाबदारी एकट्या थोंटेवर होती, असे संघटनेचे म्हणणे आहे.

Web Title: marathi news nagpur news ZP water