पोलिस निरीक्षकाने केली चालकाला मारहाण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

नागपूर - वर्धा जिल्हा पोलिस दलात असलेला पोलिस निरीक्षक कमलेश जयस्वालने बॅंक मॅनेजरला मारहाण केल्याची घटना समोर आली. सोशल मिडियातून पोलिस निरीक्षकाचा मारहाणीचा व्हिडिओ व्हायरला झाला आहे. प्रतापनगर पोलिसांनी पोलिस निरीक्षकावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

गणेश नारनवरे (५४, रा. हिंगणा टी-पॉईंट) हे बॅंकेत मॅनेजर आहे. १३ मार्चला रात्री आठ वाजता कारने मुलगा साहिलसोबत खरेदी करण्यासाठी गेले. रात्री साडेआठ वाजता परत येताना हिंगणा टी-पॉईंटजवळ ट्रॅफिक जाम झाल्याने कार थांबवली. त्यांच्या कारला पोलिस वर्दीत असलेल्या कमलेश जयस्वाल यांची कार धडकली. जयस्वाल खाली उतरले आणि नारनवरे यांना शिवीगाळ करायला लागले. जयस्वाल मद्यप्राशन करून होते, असा आरोप नारनवरे यांनी केला आहे. पोलिस निरीक्षक जयस्वाल यांनी नारनवरे यांना मारहाण करून वर्दीचा गैरवापर करीत पाहून घेण्याची धमकी दिली. अनेकांनी मोबाईलने शूटिंग करीत सोशल मिडियावर व्हायरल केली.

Web Title: marathi news Police inspector social media viral Video