महसुलचे अधिकारी नागरीकांच्या समस्यांप्रती हलगर्जी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जानेवारी 2018

संग्रामपुर (बुलढाणा) - रेती चोरी बाबत मला फोन करायचा नाही, अशी ताकीद खुद्द महसुलचे उपविभागीय अधिकारीच नागरीकांना देत असल्याचा प्रकार दोन दिवसापूर्वी या तालुक्यात उघडकीस आला आहे. 

संग्रामपुर (बुलढाणा) - रेती चोरी बाबत मला फोन करायचा नाही, अशी ताकीद खुद्द महसुलचे उपविभागीय अधिकारीच नागरीकांना देत असल्याचा प्रकार दोन दिवसापूर्वी या तालुक्यात उघडकीस आला आहे. 

पूर्णा नदीमधून दररोज ट्रक्टरद्वारा रेतीची चोरटी वाहतूक केली जात आहे. याला आळा घालावा म्हणून पूर्णा नदीकाठचे काही नागरिक पुढाकार घेण्याचा प्रयत्न करित आहेत. असाच पुढाकार भोनगाव येथील शेळके नामक नागरीकाने काही ग्रामस्थांना घेऊन 1 ट्रक्टर नदीत घेरुन ठेवले आणि महसुल विभागाला भ्रमनध्वनिद्वारा सूचना दिली. संग्रामपुर महसुल विभाची ढिलाई पाहून उपविभागीय अधिकारी यांना कॉल करण्यात आला. उपविभागीय अधिकारी यांनी रेती चोरी बाबत माहिती देणाऱ्याला चांगलेच खडसावले. या फोनवरील संभाषणाची ऑडियो क्लिप सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने हा प्रकार समोर आला आहे. उपविभागीय अधिकारी यांनी नागरीकांना मला फोन करु नका अशी ताकीद देउन पोलिस स्टेशनला जाउन सदर ट्रक्टर आणि चालक याची फिर्याद देणेबाबत सूचित केले. यामुळे नागरीकांमध्ये प्रशासनाबाबत रोष व्यक्त केला जात आहे. या संदर्भात वरिष्ठ पातळीवर ग्रामस्थ तक्रार करणार असल्याचे समजते.

Web Title: marathi news revenue officer the Problems of Citizens