विविध मागण्यांसाठी काँग्रेसचा उपविभागीय कार्यालयावर मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 डिसेंबर 2017

एटापल्ली : तालुका काँग्रेसच्या वतीने शेतकरी, शेतमजूर, वृद्ध, विधवा महिला व विद्यार्थ्यांच्या समस्या, मूलभूत सोयीसुविधा व न्याय हक्क मागण्या घेऊन उपविभागीय अधिकारी कार्यालयावर तालुका काँग्रेस अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य संजय चरडुके, पंचायत समिती सदस्य शालिक गेडाम, नगरपंचायत उपाध्यक्ष रमेश गंपावार, सुधाकर टेकाम व हरिदास टेकाम यांचे नेतृत्वात मोर्चा काढला.

शेती उत्पादनात साठ टक्के घट झाल्याने तालुका दुष्काळग्रस्त घोषित करुन एकरी दहा हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, प्रलंबित वनहक्क दावे त्वरित मंजूर करण्यात यावे, जारावंडी कसनसुर मार्गाच्या रस्त्याची दुरुस्ती तथा याच मार्गावरील झुरी व कांदळी नाल्यावरील पुलांची दुरुस्ती करुन बंद असलेली बस सेवा त्वरित सुरु करावी, शिक्षण व आरोग्य सेवा बळकट करावी, पीपली बुर्गी येथे आरोग्य केंद्र सुरु करावे, शेती योजना लाभार्थ्याला जात वैधता प्रमाणपत्र अटीत शिथिलता द्यावी, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र तहसीलदार यांचे शपथपत्रानुसार मिळावे, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी. 

तसेच विद्यार्थ्यांना नियमित शिष्यवृत्ती देण्यात यावी, श्रावणबाळ वृद्धापकाळ, संजय गांधी निराधार योजनेचे पेंशन दरमहा एक हजार रुपये द्यावे, धान खरेदी केंद्रे त्वरित सुरु करावे, कसनसुर व गट्टा परिसरात वीज उपकेंद्रे उभारुन वीजपुरवठा सक्षम करावे, इत्यादी मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले.

यावेळी युवाध्यक्ष मोहन नामेवार, सरपंच मंदा गेडाम, शामल मडावी, सुनंदा उइके, वर्षा, तुलशीराम मडावी आदींसह शेकडो नागरिक उपस्थित होते.

Web Title: marathi news various demand agitaion Sub divisional office