पैनगंगा नदी पात्रात सापडल्या दोनशे वर्षे जुनी महादेव पींड

सचिन शिंदे
रविवार, 11 फेब्रुवारी 2018

आर्णी - विदर्भ मराठवाड्याची हद्द ठरवणारी पैनगंगा नदी आर्णी तालुक्यातील साकुर गावाजवळून वाहते. त्या नदीपात्रामध्ये अनेक पुरातन वास्तु आढळून येत आहे. साकुर वरुन माहुर गड जाणारी पायवाट पैनगंगा नदीतून जाते. त्या पायवाटे लगत नदी पात्रात अंदाजे दोनशे वर्षे पुरातन असलेल्या महादेव पींड असलेला अखंड दगड आढळून आला. त्या दगडावर नऊ पींड व नंदी कोरलेली स्पष्ट दिसून येत आहे. ते एकुण बाराजोतिर्लींग असल्याचा अंदाज गावातील जेष्ठ नागरिकांनी वर्तविला आहेत.

साकुर ते श्रीक्षेत्र माहुर गड जाणारी पायवाट पैनगंगा नदीमधून जाणारी आहे. त्यावर रोज शेकडो लोक माहुरला ये-जा करतात. ता. 10 फेब्रुवारी ला नेहमीप्रमाणे साकुर येथील महिला सिताबाई गेडामसह काही महिला नेर या गावी मजुरीकरीता जात असतांना सिताबाईची नजर पैनगंगा नदीतील एका दगडावर गेली. तिला तिथे एक अखंड दगडावर पींडीचा आकार दिसला. तिने लगेच सोबत असलेल्या महिलांना दाखवला. पिंडीचे दर्शन झाल्याचा आनंद त्यांनी गावातील लोकांना बोलून दाखवला. ते पाहण्यासाठी गावातील नागरिकांनी एकच गर्दी केली. त्या दगडाची साफसफाई गावकऱ्यांनी केली. तर एक दोन नाही तर तब्बल नऊ पींड व नंदी स्पष्ट आढळून आले. त्यामुळे आता या ठिकाणी बारा जोतिर्लींग असल्याचे जाणकारांच्या मते बोलल्या जात आहे.

यावर्षी पावसाळा कमी झाल्यामुळे नदीला पुर आला नाही त्यामुळे नदी पात्रातील संपुर्ण पाणी आटल्याने तसेच रेतीचा उपसा झाल्याने नदीतील दगड पुर्ण उघडे पडले आहे. सुरवातीला नदीचे पात्र लहान असतांना हे कोरलेले असावे, असा अंदाज आहे. ते किती पुरातन असू शकते, हे सांगणे कठीण असल्याचे गावातील माजी पोलिस पाटील मनोहर पाटील यांनी व सुनिल पांडे यांनी सांगितले आहे. 

Web Title: marathi news vidarbha aarni Ancient idol found