अकोल्यातील वैद्यकीय महाविद्यालयात अधिसेविकांचे कामबंद आंदाेलन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 मार्च 2018

डॉक्टर विरूद्ध अधिसेविका वाद वाढल्याने सर्वाेपचारमध्ये चक्क चार तास रुग्णसेवा खाेळंबली.

अकाेला - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एक महिला डॉक्टरने अधिसेविका आणि त्यांच्या पतीसाेबत केलेल्या असभ्य वर्तवणुकीचे रुपांतरण डॉक्टर विरूद्ध अधिसेविका असे झाले. हा वाद चिघडल्याने अधिसेविकांनी थेट कामबंद आंदाेलन केल्याने सर्वाेपचारमध्ये चक्क चार तास रुग्णसेवा खाेळंबली.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सहयाेगी प्राध्यापक डॉ. वैशाली काेरडे आणि अधिसेविका जयश्री भदे (लाखे) यांच्यात बुधवारी (ता. 7) वाद झाला हाेता. दाेघांनीही एकमेकांविरूद्ध सिटी काेतवाली पाेलिस ठाण्यात तक्रारी दिल्या हाेत्या. त्यावरून पाेलिसांनी गुन्हे दाखल केले. महिला डॉक्टरच्या असभ्य वर्तनुकीच्या निशेधार्थ अधिसेविकांनी दाेन दिवसांपूर्वी सर्वाेपचार परिसरात आंदाेलन केले हाेते. महाविद्यालय प्रशासनाने या प्रकरणावर चौकशी समिती गठीत करुन अधिसेविका जयश्री भदे यांना शासकीय निवसस्थान खाली करण्याबाबत पत्र दिले हाेते. शिवाय, मेट्रनला देखील कारणे दाखवा नाेटीस बजावण्यात आली हाेती. परिणामी हा वाद चिघळून सकाळी 8 वाजता अधिसेविकांनी काम बंद आंदाेलनास सुरवात केली. डॉक्टर आणि अधिसेविका यांच्यातील वाद चिघडल्याने रुग्णसेवा प्रभावित झाली. तब्बल चार तास रुग्णसेवा विस्कळीत झाल्याने, अधिष्ठाता डाॅ. राजेश कार्यकर्ते यांनी चौकशी समिती स्थगित करून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला.

प्रकरण पाेलिसांकडे
हे प्रकरण संबंधितांचे वैयक्तिक असून, दाेघांनी देखील एकमेकांविरूद्ध पाेलिसांत तक्रार दिली असून, त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल झाले आहेत. त्यामुळे पुढील कारवाई हे पाेलिसच करणार असल्याची भूमिका अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी घेतली.

काळ्या फिती लावून केले काम
डॉक्टर विरूद्ध अधिसेविका यांच्यातील वादाच्या निषेधार्थ दाेन्ही गटाने काळ्या फिती लावून कामकाज केले.

Web Title: marathi news vidarbha akola government medical college agitation doctor nurse