साठवलेल्या कापसामुळे होत आहेत त्वचा रोग; शेतकरी त्रस्त

कैलास ठेंगे
बुधवार, 7 मार्च 2018

शेतकऱ्यांच्या अडचणी काही केल्या संपता संपत नाही आहे. पहिले निसर्गाचा प्रकोप झाला. पाणी कमी पडल्याने यवतमाळकर शेतकरी अडचणीत सापडला. थोडे फार कापूस आला त्यात बोंड अळीने हातचा कापुस गेला. जो कापुस आला थोडाफार विकुन उरलेला कापुस भविष्यात भाव वाढतील या आशेने साठवुन ठेवला.

कुंभा (ता. मारेगाव जिल्हा यवतमाळ) : कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागचे नष्टचर्य संपता संपत नाही आहे. कापसाची गंजी घरी साठविल्यामुळे शेतकरी कुटूंबातील सदस्यांना मोठ्याप्रमाणावर त्वचारोग होत असल्याचे दिसुन येत आहे. यामुळे शेतकरी कुटुंबीय त्रस्त झाले असुन चिंतातुर झाले आहेत.

शेतकऱ्यांच्या अडचणी काही केल्या संपता संपत नाही आहे. पहिले निसर्गाचा प्रकोप झाला. पाणी कमी पडल्याने यवतमाळकर शेतकरी अडचणीत सापडला. थोडे फार कापूस आला त्यात बोंड अळीने हातचा कापुस गेला. जो कापुस आला थोडाफार विकुन उरलेला कापुस भविष्यात भाव वाढतील या आशेने साठवुन ठेवला. पण हाच कापुस शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे. कापसातील किड्यांनी व अळ्यांनी शेतकऱ्यांना मोठ्याप्रमाणावर त्वचारोगाचा प्रादुर्भाव होत आहे.

आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. शासनाने या त्वचा रोगाकडे दुर्लक्ष करु नये व घरगुती उपचार करु नये असे आवाहन केले आहे. हा विषय गंभीर असुन शासन दरबारी हे विषय लावुन धरणार असल्याचे शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यानी म्हटले आहे.

Web Title: Marathi news Vidarbha news cotton farmer disease