बुलडाणा: वर्षभरात शेतकरी कुटुंबातील ३०५ आत्महत्या

श्रीधर ढगे
सोमवार, 29 जानेवारी 2018

गेल्यावर्षी जिल्ह्यात शेतकरी कुटूंबातील ३०५ सदस्यांनी मृत्यूला कवटाळले. खामगावचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यावर म्हणाले, की शेतकरी आत्महत्येचे सत्र थांबविण्यासाठी शासनाने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी.'

खामगाव (बुलढाणा) - वयोवृद्ध शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्येनंतर महाराष्ट्रातील वातावरण ढवळून निघाले. शेतकरी आत्महत्या विषयावर पुन्हा चिंता व्यक्त होत आहे. बुलडाणा जिल्ह्यातही शेतकरी व त्यांच्या कुटूंबातील सदस्यांचे आत्महत्या सत्र सुरु आहे. गत २०१६ मध्ये शेतकरी परिवारातील २४१ तर सन २०१७ मध्ये ३०५ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. 

सरकार बदलले मात्र शेतकऱ्यांची वाताहात कायम आहे. दुष्काळ, दुबार-तिबार पेरणी,  बियाणे व खतांचे भाव वाढलेले सोबतच शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत अडकलेला आहे. शेतकऱ्यांच्या डोक्यावरचा कर्जाचा डोंगर दरवर्षी वाढतच चालला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पदरी पडणारी निराशा आता त्यांच्या घरातील सदस्यांना सुध्दा जकडत आहे. 

गेल्यावर्षी जिल्ह्यात शेतकरी कुटूंबातील ३०५ सदस्यांनी मृत्यूला कवटाळले. खामगावचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यावर म्हणाले, की शेतकरी आत्महत्येचे सत्र थांबविण्यासाठी शासनाने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी.'

सरकार बदलले मात्र शेतकऱ्यांची वाताहात कायम आहे. दुष्काळ, दुबार-तिबार पेरणी, बियाणे व खतांचे भाव वाढलेले सोबतच शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत अडकलेला आहे. शेतकऱ्यांच्या डोक्यावरचा कर्जाचा डोंगर दरवर्षी वाढत चालला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करीत आहेत. शेतकऱ्यांना पदरी पडणारी निराशाच आता त्यांच्या घरातील सदस्यांना सुध्दा जकडत आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात शेतकरी कुटूंबातील ३०५ सदस्यांनी मृत्यूला कवटाळले.

शासन या आत्महत्या रोखण्यात अपयशी ठरले आहे. बुलडाणा जिल्ह्यातच गेल्यावर्षी २०१७ मध्ये शेतकरी कुटूंबातील ३०५ सदस्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. २०१७ मध्ये 
खामगांव तालुक्यातील ४२, शेगांव ११, मलकापूरत १५, नांदुरा २३, जळगांव जामोद १९, संग्रामपूर १७, मोताळा २४, बुलडाणा ३६, चिखली ४३, देऊळगांव राजा १५, लोणार २२, मेहकर तालुक्यात २९ आत्महत्या झाल्या आहेत. शेतकऱ्यांना न्याय देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. 

Web Title: marathi news vidarbha news farmers suicide in Buldhana