शेगावात उसळला भक्तीसागर; हजारच्यावर भजनी दिंड्याचा सहभाग

संजय सोनोने 
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

शेगाव - 'गजानना अवलीया, अवतरले जग ताराया', 'गण गण गणात बोते' च्या गजरात शेगाव येथे संत श्री गजानन महाराज यांचा 140 वा प्रकटदिन बुधवारी लाखो भाविकांच्या साक्षीने उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रकटदिनोत्सवाला 1 फेब्रुवारीपासून सुरवात झाली असून याअंतर्गत दररोज काकडा, भजन, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन आदी कार्यक्रम सुरु आहेत. या प्रकट दिनानिमित्त 1 फेब्रुवारीपासूनच शेगावात उत्सवाला सुरवात झाली आहे. दरम्यान या उत्सवात राज्यभरातील तब्बल एक हजारच्यावर दिंड्या शेगावात दाखल झाल्या होत्या. भाविकांचीही मोठी गर्दी सध्या विदर्भ पंढरीत होत आहे. दुपारी श्रींची पालखी शहरातून निघाली.

शेगाव - 'गजानना अवलीया, अवतरले जग ताराया', 'गण गण गणात बोते' च्या गजरात शेगाव येथे संत श्री गजानन महाराज यांचा 140 वा प्रकटदिन बुधवारी लाखो भाविकांच्या साक्षीने उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रकटदिनोत्सवाला 1 फेब्रुवारीपासून सुरवात झाली असून याअंतर्गत दररोज काकडा, भजन, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन आदी कार्यक्रम सुरु आहेत. या प्रकट दिनानिमित्त 1 फेब्रुवारीपासूनच शेगावात उत्सवाला सुरवात झाली आहे. दरम्यान या उत्सवात राज्यभरातील तब्बल एक हजारच्यावर दिंड्या शेगावात दाखल झाल्या होत्या. भाविकांचीही मोठी गर्दी सध्या विदर्भ पंढरीत होत आहे. दुपारी श्रींची पालखी शहरातून निघाली. यात लाखो भाविक उपस्थित होते.
                           
बुधवारी माघ वद्य-सप्तमी अर्थात 7 फेब्रुवारीला सकाळपासून श्रींच्या प्रकटदिनानिमित्ताने दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. अत्यंत शिस्तीत भक्तांनी श्रींचे दर्शन घेतले. दुपारी 12 वाजता गुलाबपुष्प गुलाल उधळून श्रींचा प्रकट सोहळा भक्तिभावाने साजरा करण्यात आला. यावेळी संस्थानचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील, 
यांच्या प्रमुख उपस्थितीत महारुद्रस्वाहाकार यज्ञाची पुर्णाहूती संपन्न झाली. या उत्सवात 1 ते 7 फेब्रुवारी दरम्यान 1 हजारच्यावर भजनी दिंड्यांचे आगमन झाले होते. संस्थानच्या वतीने 2 लाखावर भक्तांना महाप्रसाद वितरण करण्यात आले. नागपूर टिमकी श्रीभक्त मंडळाच्या वतीने वारकऱ्यांचे पादत्राणे विनामुल्य ठेवण्याची व्यवस्था करण्यात आलाय होती.. 

श्रींची भव्य नगर परिक्रमा
श्रींच्या 140 व्या प्रकटदिनी श्रींच्या पालखीची दुपारी 2 वाजता रथ, मेणा, गज अश्‍वासह नगर परिक्रमा काढण्यात आली. श्रींची पालखी दत्तमंदिर, हरहर शिवमंदीर श्री शितलनाथ महाराज मंदिर, फुलेनगर श्रींचे पकटस्थळ, श्री मारोती मंदीर बाजार विभाग, बसस्थानक व्यापारपेठ मार्गे श्रींची पालखी काढण्यात आली. शिवमंदिर, श्री प्रकटस्थळ, श्री मारोती मंदीर येथे विश्‍वतांच्या हस्ते पुजा करण्यात आली. यावेळी शहर ठिकठिकाणी भक्तांच्या वतीने वारकर्‍यांना चहा, नाश्टा, फराळ, व महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. अनेकांनी श्रींच्या पालखीवर पुष्पवृष्टी केली. प्रकट दिनानिमित्त भाविकांची झालेली गर्दी पाहता पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला. वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून पार्किंग व्यवस्थाही शहरात ठिकठिकाणी कर्म्याट आली होती. दिंड्यांच्या आगमनामुळे विदर्भ पंढरीत भक्तीमय वातावरण झाले होते.

Web Title: marathi news vidarbha shegaon lord gajanan