चिमूर तालुक्यातील एकवीस ग्रामपंचायतीत निवडणुक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जानेवारी 2018

चिमूर - राज्य निवडणुक आयोगाने घोषित केलेल्या सार्वत्रिक पोटनिवडणुक कार्यक्रमाअंतर्गत चिमूर तालुक्यातील एकवीस ग्रामपंचायतींमध्ये एकुण पंचवीस ग्रामपंचायत सदस्य निवडीकरीता पोटनिवडणुक २५ फेब्रुवारीला होणार असल्याची माहिती चिमूरचे तहसीलदार संजय नागटिळक यांनी दिली. यामुळे आवडीच्या उमेदवाराची चाचपणी सुरु झाली आहे.

चिमूर - राज्य निवडणुक आयोगाने घोषित केलेल्या सार्वत्रिक पोटनिवडणुक कार्यक्रमाअंतर्गत चिमूर तालुक्यातील एकवीस ग्रामपंचायतींमध्ये एकुण पंचवीस ग्रामपंचायत सदस्य निवडीकरीता पोटनिवडणुक २५ फेब्रुवारीला होणार असल्याची माहिती चिमूरचे तहसीलदार संजय नागटिळक यांनी दिली. यामुळे आवडीच्या उमेदवाराची चाचपणी सुरु झाली आहे.

महाराष्ट्र राज्य निवडणुक आयोगाने घोषित केल्याप्रमाणे ग्रामपंचायती निवडणुकांचे आठ टप्पे पाडण्यात आले आहेत. त्याप्रमाणे निवडणुक नोटीस प्रसिद्धी २५ जानेवारीस, नामनिर्देशन पत्रे घेणे व सादर करण्याची मुदत ५ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी, १२ जानेवारीला छाननी, अर्ज मागे घेण्याची मुदत, निवडणुक चिन्ह वाटप व अंतिम यादी प्रसिद्धी १५ फेब्रुवारी, मतदान दिनांक २५ फेब्रुवारी, मतमोजणी २६ फेब्रुवारी आणि निवडणुक निकाल जाहीर करण्याची मुदत २७ फेब्रुवारीला ठेवण्यात आली आहे. या निवडणुक कार्यक्रमाप्रमाणे चिमूर तालुक्यातील एकवीस ग्रामपंचायतीमध्ये २५ ग्रामपंचायत सदस्याकरीता पोटनिवडणुक होणार आहे.

राजीनामा दिल्यामुळे सात ग्रामपंचायत सदस्याकरीता मुरुपार तुकुममधील प्रभाग २, सावर्ला येथील प्रभाग २, बोथली सीरपुर येथील प्रभाग ३, बोथली वहानगाव येथील प्रभाग ३, बोरगांव बुटी येथील प्रभाग २, भीसी येथील प्रभाग ४, सोनेगाव वन येथील प्रभाग २ करीता निवडणुक होणार आहे. नामनिर्देशीत पत्र प्राप्त न झाल्यामुळे रिक्त असलेल्या मुरपार (तु), सिरसपुर, लोहारा, वाघेडा, वाकर्ला, येरखेडा, कन्हाळगाव, कळमगाव, नविन जामणी दोन प्रभागात, पिंपळगाव, कपर्ला (खुर्द), गोंदेडा येथील दोन प्रभाग, आंबेनेरी, कीटाळी (तु) अशाप्रकारे सोळा ग्रामपंचायत सदस्याकरीता निवडणुक होणार आहे.

सदस्यत्व अपात्र घोषित झाल्यामुळे अडेगाव देश प्रभाग १ मधील अनुसुचित जाती पुरुष व स्त्री दोन जागेकरीता निवडणुक होणार आहे. अशा प्रकारच्या निवडणुक कार्यक्रमाविषयी माहिती तहसीलदार चिमूर संजय नागटिळक यांनी दिली.

Web Title: marathi news vidarbha zp elections