बच्चू कडू यांच्या मोर्चाला हिंसक वळण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

अमरावती - शेतकरी, शेतमजुरांच्या मागण्यांना घेऊन आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात गुरुवारी काढण्यात आलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले. 

अनियंत्रित मोर्चेकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडून घुसण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला. त्यानंतरही जमाव नियंत्रित होत नसल्याचे पाहून पोलिसांनी अश्रुधुराच्या पाच नळकांड्या फोडल्या. मार्चेकऱ्यांनी दगडफेक केल्याने यात पोलिस कर्मचाऱ्यांसह सहा ते सातजण जखमी झाले. 

नोटाबंदीमुळे सरकार त्यांचा फायदा झाल्याचा दावा करीत असले, तरी शेतकरी, शेतमजुरांचे नुकसान झाले. त्याची भरपाई व्हावी, त्याकरिता शासनाने विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.

त्यासोबतच तूर, कपाशी व इतर शेतमालाचे भाव कमी झाले आहेत, त्याकरिता देखील शासनाने सानुग्रह अनुदानरूपी मदत देण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. याविरोधात  आज विभागीय आयुक्‍त कार्यालयावर मोर्चा  निघणार होता; परंतु पदवीधरची निवडणूक आचारसंहिता लागल्याने एेनवेळी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. मोर्चा या ठिकाणी पोचताच मोर्चेकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडत आत शिरण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी पोलिसांनी पाण्याचा मारा केला. तरीसुद्धा जमाव अनियंत्रित होत असल्याने पोलिसांनी लाठीमार केला. त्यानंतरही परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याचे पाहता पोलिसांनी अश्रुधुराच्या पाच नळकांड्या फोडल्या.  आमदार कडू यांनी मोर्चा दरम्यान घडलेल्या घटनेची दोन तासांत चौकशीची मागणी करीत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातच ठिय्या दिला.

Web Title: The march of bacchu kadu turn violent