चुकीच्या प्रश्‍नांसाठी मिळणार गुण 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यपीठाच्या वाणिज्य पदवी अभ्यासक्रमातील (बी.कॉम.) अंतिम वर्षाच्या "फायनान्शिअल अकाउंटिंग' या पेपरमध्ये झालेल्या चुकांसंदर्भात विद्यार्थ्यांनी सोडविलेल्या प्रश्‍नांच्या आधारावर गुणांकन करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या समितीने घेतला. या पेपरमध्ये तीन प्रश्‍न चुकीचे विचारण्यात आल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली होती. 

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यपीठाच्या वाणिज्य पदवी अभ्यासक्रमातील (बी.कॉम.) अंतिम वर्षाच्या "फायनान्शिअल अकाउंटिंग' या पेपरमध्ये झालेल्या चुकांसंदर्भात विद्यार्थ्यांनी सोडविलेल्या प्रश्‍नांच्या आधारावर गुणांकन करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या समितीने घेतला. या पेपरमध्ये तीन प्रश्‍न चुकीचे विचारण्यात आल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली होती. 

वाणिज्य पदवी अभ्यासक्रमातील (बी. कॉम.) अंतिम वर्षाचा "फायनान्शिअल अकाउंटिंग' विषयाचा पेपर दहा एप्रिल रोजी घेण्यात आला. या पेपरमध्ये तीन प्रश्‍न चुकीचे असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला. त्यामुळे किमान 60 गुणांचे नुकसान होणार असल्याने विद्यापीठाने त्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली. यासाठी अनेक संघटनांनी निवेदनही सादर केले. दरम्यान, या पेपरच्या तपासणीसाठी अधिष्ठाता डॉ. विनायक देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्यात आली. तपासणीमध्ये पेपरमधील प्रश्‍नक्रमांक 2-सी, 3- सी हे दोन प्रश्‍न चुकीचे होते. तर आणि 5- सी या प्रश्‍नांमध्ये देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार प्रश्‍न सोडविता येणे शक्‍य असल्याचे तज्ज्ञांच्या निदर्शनास आले. गुरुवारी झालेल्या समितीच्या बैठकीत ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्‍नक्रमांक 2- सी, 3- सी आणि 5- सी हे काही प्रमाणात तरी सोडविले असेल त्या विद्यार्थ्यांना प्रश्‍नाच्या सोडवणुकीच्या टप्प्यानुसार गुणदान करावे, असा निर्णय घेण्यात आला. यामुळे प्रश्‍न सोडविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रश्‍नपत्रिकेतील चुकांची भरपाई मिळणार आहे. आता लवकरात लवकर पेपरचे मूल्यांकन करून गुणदान देण्यात येईल. 

दोन प्रश्‍न चुकीचे 
प्रश्‍न सोडविण्याच्या टप्प्यानुसार प्रश्‍नांना जास्तीत जास्त गुणदान करावे, अशा सूचना गुरुवारी झालेल्या बैठकीत दिल्या. तज्ज्ञांनी दोन प्रश्‍न चुकीचे असल्याचा निर्वाळा दिला. 5-सी या प्रश्‍नाचे उत्तर येते. मात्र, ज्यांनी हा प्रश्‍न सोडविला आहे, त्यांनाही चांगले गुण द्यावे असे सांगण्यात आले. परंतु, ज्यांनी हे तीन प्रश्‍न सोडवले नाहीत त्या विद्यार्थ्यांचा विचार करण्यात येणार नाही, असेही परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे डॉ. नीरज खटी यांनी स्पष्ट केले. 

बीसीसीएबाबतही निर्णय होणार 
बीसीसीएच्या परीक्षेतही गोंधळ उडाला होता. या कोर्सच्या प्रश्‍नपत्रिकेत एक प्रश्‍न छापूनच आलेला नाही. ही बाब चुकीची आहे. तो छापला असून चुकीचा आहे. हा प्रश्‍न केवळ दोन गुणांचा असल्याने त्यासंदर्भातही लवकरच निर्णय होणार असल्याची माहिती डॉ. खटी यांनी दिली. 

Web Title: mark to get wrong questions