सोशल मीडिया करतोय सुखी संसाराचा 'काडीमोड'

श्रीधर ढगे
शुक्रवार, 20 डिसेंबर 2019

पती-पत्नीमधील वाद, गृह कहलातून अनेक सुखी संसाराचा काडीमोड होतो. फेसबुक, टिकटॉक, व्हाट्स अप आणि दारूचे व्यसन अनेकांच्या सुखी संसारात विष कालवत असल्याचे वास्तव पोलीस विभागाच्या महिला समुपदेशन केंद्राच्या निरीक्षणात समोर आले आहे. या विभागात वर्षभरात विविध 160 प्रकरणे दाखल झालेली आहेत.

खामगाव (जिल्हा बुलडाणा) : पती-पत्नीमधील वाद, गृह कहलातून अनेक सुखी संसाराचा काडीमोड होतो. फेसबुक, टिकटॉक, व्हाट्स अप आणि दारूचे व्यसन अनेकांच्या सुखी संसारात विष कालवत असल्याचे वास्तव पोलीस विभागाच्या महिला समुपदेशन केंद्राच्या निरीक्षणात समोर आले आहे. या विभागात वर्षभरात विविध 160 प्रकरणे दाखल झालेली आहेत.

पती, सासरच्या लोकांकडून महिलांचा छळ, त्रास होत असल्यास कायद्यात कारवाई करण्याची तरतूद असून पोलिस गुन्हा दाखल करून अशी प्रकरणे न्यायालयात दाखल करतात. मात्र थेट गुन्हा दाखल न करता महिलेने तक्रार दिल्यावर पोलिस अधिकारी समेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करतात. त्यासाठी पोलिस ठाण्यात समुपदेशन केंद्र आहेत. महिलांच्या तक्रारीवर दोन्ही बाजू ऐकून पती पत्नीमध्ये कशाने वाद आहेत, वादाची कारणं काय हे ऐकून त्यावर तोडगा काढला जातो. संसाराची गाडी पुन्हा सुरळीत रूळावर आणायचे काम हा विभाग करत असतो. खामगाव पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा महिला समुपदेशन केंद्रात घरगुती वाद सोडविल्या जातात. 

हेही वाचा - ... तर 10 रुपये थाळीचं होईल झुनका भाकर

कहाणी घर घर की
पोलिसांच्या आकडेवारीनुसार 50 टक्के संसारात विष कालविण्यामागे मोबाईलचा अतिवापर, फेसबुक, व्हाट्स अप सारख्या सोशल मीडियावर पती पत्नीचे जास्त वेळ व्यस्त असणे, पतीला दारूचं व्यसन, त्यातून पत्नीशी वाद, तंटे असे प्रकार ही कारणे असल्याचे आढळून आले. सोशल मीडियाने होणारे वाद तर जणू ' कहाणी घर घर की' सारखेच झाले आहेत. त्यामुळे प्रत्येकाने कुटुंबात असताना सोशल मीडियाच्या वापराची मर्यादा ठरवायला हवी, हेच घरगुती वादाच्या अनेक केसेसमध्ये दिसून आलं आहे. खामगाव शहर पोलीसांच्या महिला समुपदेशकेंद्राकडे दोनशे आसपास घरुगुती भांडणाच्या केसेस येतात. त्यापैकी 50 टक्के कुटुंबाच्या सुखी संसारात मोबाईल आणि सोशल मिडियाने विष पेरले असल्याची बाब समोर आली आहे.

हेही वाचा - स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या वैराग्याचे ऋणमोचन विकासाच्या प्रतिक्षेत!

63 प्रकरणांमध्ये समुपदेशन
खामगाव समुपदेशन केंद्रात एकट्या तालुक्यात मागील अकरा महिन्यात एकूण 160 प्रकरणे दाखल झाली होती. यापैकी 63 प्रकरणे समुपदेशाद्वारे सोडविण्यात आली असून 5 प्रकरणात गुन्हे दाखल झालेले आहे. तर काही प्रकरणे न्यायालयापर्यंत पोहचलेली आहे. मात्र यामध्ये सर्वाधिक प्रमाण हे मोबाईल, व्हाटसअप्प, फेसबुक यावरून झालेल्या वादाचे असल्याचे वास्तव समोर आले आहे.  
- प्रीती मगर, प्रमुख - महिला समुपदेशन केंद्र, खामगाव

हेही वाचा - सकाळ-संध्याकाळी रस्त्यावरून वाघाचे वॉक

मोबाईल कालवत आहे सुखी संसारात विष
हूंडा,घरगुती हिंसाचार, व्यभीचार, विवाहबाह्य संबंध या कारणांनी पूर्वी संसारात काडीमोड होत असत. पण आता मोबाईल आणि सोशल मीडिया सुखी संसार विष कालवत असल्याचं धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.. ही बाब नक्कीच चिंताजनक आहे. संसारात  सुसंवाद नसल्यामुळे भांडणं-तंटे होत आहेत.
-सुनिल अंबुलकर, पोलिस निरीक्षक,  शहर पोलिस स्टेशन खामगाव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marriage divorce court