सासऱ्याने जावयाची केली दहा लाखांची मदत; मात्र, सासरच्या त्रासाला कंटाळून मुलीने घेतला कठोर निर्णय

Married woman commits suicide due to Amravati harassment
Married woman commits suicide due to Amravati harassment

अमरावती : जावई कर्जबाजारी झाला. मुलीचा संसार विस्कटण्याच्या परिस्थितीत होता. त्यामुळे पित्याने मोठ्या मनाने जावयाला दहा लाखांची मदत केली. परंतु, पैसे परत करणे तर सोडाच त्याने पत्नीचा छळ करून तिला आत्महत्या करण्याचा प्रवृत्त केले. रूपेश परसराम कदम (रा. परभणी) असे पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक व्यवहार करताना रूपेश कदम हा कर्जबाजारी झाला. त्याने सासरे मुरलीधर मारोतराव ढवळे (वय ५८, रा. बाभूळगाव) यांच्याकडे काही वर्षांपूर्वी दहा लाख रुपये उधार घेतले होते. सासऱ्यांसह रूपेशच्या पत्नीने घेतलेली रक्कम परत करण्याची मागणी केली असता रूपेशसह अन्य लोकांनी ढवळे यांच्या मुलीला जबर मारहाण सुरू केली.

पतीसह सासरच्या त्रासाला कंटाळून रूपेशच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलीच्या आत्महत्येस जावई रूपेशसह तिच्या सासरची मंडळीच जबाबदार असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला. त्यावरून मुरलीधर ढवळे यांनी गाडगेनगर ठाण्यात तक्रार दिली असता पोलिसांनी जावई रूपेशसह श्रीराम कदम व कुटुंबातील दोन महिला अशा चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे, सदोष मनुष्यवध प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

अर्ध्या कि.मी.चा शॉर्टकट जिवावर बेतला

अनिल आनंदराव इंगळे (वय ३५) हा बुधवारपासून घरी गेला नाही. नातेवाइकांनी नागरिकांच्या मदतीने नदीपात्रात शोध सुरू केला. खल्लार लांडी रस्त्यालगतच्या चंद्रभागा नदीच्या पात्रातील आसरा माता मंदिरापुढे त्यांचा मृतदेह नदीपात्रात आढळला. वासुदेव इंगळे यांनी खल्लार पोलिस स्टेशनला माहिती दिली. पोलिस उपनिरीक्षक आशिष गंद्रे यांच्या पथकाने पंचनामा केला. अकस्मात मृत्यू अशी नोंद घेतली.

संततधार पावसामुळे पाण्याचा ओघ जास्त

खल्लार ते लांडी या गावाचे अंतर मुख्य रस्त्याने गेल्यास चार किलोमिटर पडते. परंतु, नदीपात्रातून गेल्यास अर्धा किलोमिटर अंतर राहते. अनिल इंगळे यांनी गावी जाण्यासाठी नदीपात्रातून जाणेच पसंत गेले. संततधार पावसामुळे पाण्याचा ओघ जास्त असल्याने पाय घसरून तो पाण्यात बुडाले आणि बुडून त्यांचा मृत्यू झाला असे पोलिस उपनिरीक्षक गंद्रे यांनी सांगितले.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com