अनैतिक संबंधातून विवाहितेचा खून 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

नागपूर - अनैतिक संबंधातून अफसाना परवीन अशरफखॉं पठाण (35, रा. भिवापूर) या महिलेचा खून झाला. ही घटना गुरुवारी रात्री आठ वाजता गणेशपेठमध्ये उघडकीस आली. दिनेश देवराव चिंचवलकर (27, रा. भिवापूर) असे अटकेतील आरोपी प्रियकराचे नाव आहे. 

अफसाना ही विवाहित असून, तिला दोन मुले आहेत. तिच्याच वस्तीत राहणाऱ्या दिनेश याच्याशी तिचे तीन वर्षांपासून अनैतिक संबंध होते. दोघेही नागपूरला यायचे व कॉटन मार्केटमधील गुजरात लॉजमध्ये थांबायचे. गुरुवारी दुपारी तीन वाजता दोघेही लॉजमध्ये आले आणि रूम नं. 121 बुक केली. दोघांमध्ये वाद झाला असता दिनेशने अफसानाचा गळा आवळून खून केला. संशय येऊ नये म्हणून दिनेश दरवाजा बंद करून मेयो चौकात मटण घेण्यासाठी गेला. पावणेआठ वाजताच्या सुमारास तो लॉजवर परतला. रूमचा दरवाजा उघडला आणि जोरात किंचाळला. त्यामुळे लॉजचे कर्मचारी आणि व्यवस्थापक धावत आले. वेटरने लगेच पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून माहिती दिली. गणेशपेठ पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेतला. प्रथमदर्शनी दिनेशवर संशय आल्याने त्याची विचारपूस केली. मात्र, तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. खाक्‍या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली.

Web Title: married woman murder case