सासरच्या छळाला कंटाळून महिलेची आत्महत्या 

अनिल कांबळे
मंगळवार, 10 एप्रिल 2018

लग्नावेळी परमार यांनी जावयाला 10 लाख रुपये हुंडा दिला होता. लग्नानंतर तो पुन्हा पैसे मागायचा. त्याकरिता तो पूजाचा छळ करू लागला. त्याचे कुटुंबीयही तिचा छळ करीत होते. तिला उपाशी ठेवणे, घरात कोंडून फिरायला जाणे, शिळे अन्न खायला लावणे आणि शिवीगाळ करून मारहाण करीत होते.

नागपूर : पती व सासरच्या मंडळीच्या छळाला कंटाळून महिलेने आत्महत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी पतीसह चार जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. 

वीरेंद्र किसन सोळंकी (28), किसन भगवानदास सोळंकी (55), शांती किसन सोळंकी (50) आणि गुडिया किसन सोळंकी (23) सर्व रा. डोबीनगर, मानेवाडा रोड अशी आरोपींची नावे आहेत. एप्रिल 2014 मध्ये वीरेंद्रचा विवाह शत्रुघ्न मोहनलाल परमार (45, रा. सोनेझरीनगर, उमरेड) यांची मुलगी पूजा (24) हिच्याशी झाला. 

लग्नावेळी परमार यांनी जावयाला 10 लाख रुपये हुंडा दिला होता. लग्नानंतर तो पुन्हा पैसे मागायचा. त्याकरिता तो पूजाचा छळ करू लागला. त्याचे कुटुंबीयही तिचा छळ करीत होते. तिला उपाशी ठेवणे, घरात कोंडून फिरायला जाणे, शिळे अन्न खायला लावणे आणि शिवीगाळ करून मारहाण करीत होते. या प्रकाराला कंटाळून 2 मार्चला संध्याकाळी 5 वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणात परमार यांच्या तक्रारीवरून अजनीच्या महिला पोलिस उपनिरीक्षक भुते यांनी पूजाचा पती, सासू, सासरे व नणंदेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला. 

Web Title: A married women suicide