Corona Virus : दुकानदारांची चांदी, हे आहे कारण...

Mask sale high rates in Amravati
Mask sale high rates in Amravati

अमरावती : करोना विषाणूच्या धास्तीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर अचानक मागणी वाढल्याचे व पुरवठा घटल्याचे कारण सांगत दुकानांमधून मास्कची विक्री चढ्या दराने केली जात आहे. दुकानांमध्ये सर्जिकल मास्क आणि इतर दुकानांमध्ये माऊथ मास्क विक्रीला असतात. सर्वसाधारण मास्कची किंमत दहा रुपये आहे. हा मास्क वापरून फेकला जातो तर माऊथ मास्क नाक व तोंड झाकणारा असतो. तो नेहमीसाठी वापरला जातो. एन-95 हा मास्क हवेतील धुलीकण, जंतू शरीरात जाण्यापासून रोखण्याच्या दृष्टीने चांगला मानला जातो. मात्र, त्याच्या सरसकट विक्रीवर निर्बंध आणण्यात आल्याची माहिती आहे. 

एन-95 या मास्कची होलसेल विक्री प्रतिनग 140 रुपयांपर्यंत होती. त्यामुळे या मास्कला जास्त मागणी नव्हती. शंभर ग्राहकांमधून एखादी व्यक्ती या मास्कची मागणी करीत असे, मात्र करोनामुळे मास्कची मागणी वाढली आहे. आता हा मास्क शहरात 300 ते 350 रुपयांपर्यंत विकला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

दुकानदारांनी आगाऊ रक्कम कंपनीकडे देऊन मास्क खरेदी करण्याचे तंत्र चालविलेले आहे. ऑनलाइन विक्री करणाऱ्या कंपन्यांनी इराण, इंग्लंड, इटली इत्यादी देशांकडे मास्कचा पुरवठा वाढविलेला असल्याने अमरावतीसारख्या सर्वसामान्य शहरातदेखील चांगल्या प्रतीच्या मास्कचा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र आहे.

मोठ्या कंपन्यांतर्फे वेगवेगळ्या प्रकारच्या मास्कची ऑनलाइन किंमत प्रतिनग 10 रुपयांपासून 1600 रुपयांपर्यंत आहे. स्थानिक बाजारात एन-95 या मास्कची चिल्लर विक्री 250 रुपयांसाठी 350 रुपयांपर्यंत प्रतिनग केली जात असल्याची माहिती व्यावसायिकाने नाव उघड न करण्याच्या अटीवर दिली. 

साधारण मास्कमधून अत्यंत सूक्ष्म धुलीकण नाक व तोंडावाटे शरीरात जाण्याची शक्‍यता असते. या उलट एन-95 हा मास्क हवेतील सूक्ष्म कणसुद्धा रोखण्यात यशस्वी ठरतो, असे सांगितले जाते. जिल्ह्यात मास्क आणि औषधांचा पुरेसा साठा आहे, नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही, मॉस्क अनिवार्य नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वीच सांगितले होते.

तापमानच मारणार कोरोनाला?

कोरोना विषाणू हा 28 ते 30 अंश सेल्सिअस तापमानापर्यंतच जिवंत राहू शकतो, असे सांगितले जाते. शुक्रवारी (ता. सहा) अमरावतीसह विदर्भाचे कमाल तापमान 30.3 ते 35.5 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. 

अवांतर वापरण्याची गरज नाही 
जिल्ह्यात घाऊक आणि किरकोळ औषधी विक्रीची सुमारे 950 दुकाने आहेत. मास्कची मागणी वाढल्याचे कानावर येत आहे. एन-95 हा मास्क डॉक्‍टरांनी सूचविल्यानंतरच वापरला पाहिजे. अवांतर त्याचा वापर करण्याची गरज नाही. 
- उमेश घारोटे, 
औषधी निरीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com