अपहरणानंतर युवतीवर सामूहिक अत्याचार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

अमरावती : धारणी तालुक्‍यातील एका गावात युवतीचे (वय 19) लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अपहरण करून तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. धारणी पोलिसांनी आज, बुधवारी अपहरण व अत्याचाराचा गुन्हा दाखल करून दोन युवकांना अटक केली.

गोपाल रामू मावस्कर व भूषण सीताराम सावलकर अशी अटक केलेल्या युवकांची नावे आहेत. मंगळवारी (ता. तीन) रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. पीडित युवती गावातील किराणा दुकानात जात असताना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने नमूद दोघांनी तिला आपल्या दुचाकीवर बसविले. त्यानंतर गावातील जिल्हा परिषद शाळेसमोर असलेल्या तलावाच्या काठी नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. पीडित युवती रात्री कशीतरी घरी पोहोचली. घटनेनंतर गोपाल व भूषण पसार झाले. आज, बुधवारी पीडित युवतीसह नातेवाईकांनी धारणी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदविली. तसेच पसार दोघांच्याही अटकेची मागणी केली. पोलिसांनी काही तासांतच दोघांनाही अटक केली. उद्या, गुरुवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाईल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mass rape of a young girl after kidnap