वाढीव मोबदल्यासाठी सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जून 2018

परभणी - निम्न दुधनाच्या प्रकल्पाच्या कालव्यासाठी संपादित जमिनीचा वाढीव मोबदला देण्याच्या मागणीसाठी संबर, पिंपळगाव टोंग ता.परभणी येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी (ता.एक) येथील जायकवाडी वसाहतीसमोर सामुहीक आत्मदहनाचा प्रयत्न केला.

संबर, पिपंळगावच्या 76 शेतकऱ्यांच्या जमिनी निम्न दुधाच्या वितरण प्रणालीसाठी 2014-15 मध्ये खाजगी वाटाघाटीद्वारे संपादीत करण्यात आल्या आहेत. मात्र, या जमिनीचा मोबदला हा भुसंपादन कायदा 2013 नुसार देण्याची मागणी हे शेतकरी करीत असून, दोन महिण्यापुर्वीच ता.एक जुन रोजी सामुहीक आत्मदहन करणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला होता. त्या पार्श्वभुमीवर शुक्रवारी जायकवाडी परिसरात चारही बाजुने कडक बंदोबस्त लावला होता. मात्र भूमिगत झालेल्या शेतकऱ्यांनी दुपारी 12 च्या सुमारास पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वसाहतीच्या प्रवेशद्वारजवळच 25 हुन अधिक शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. 

यावेळी शेतकऱ्यांकडून विषारी औषधासह रॉकेलच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु होती.

Web Title: Mass suicide attempt for demand of increased price